आष्टी प्रतिनधी:१४ ऑक्टोबर
आष्टी शहर व परिसरात गुरुवारी सकाळी झालेल्या अतिवृष्टीने शहर परिसराला मोठा तडाखा बसला. विशेष करून आष्टी शहर व तालुक्यातील पांढरी परिसरात या पावसाचा जोर अधिक होता.यामुळे करंजीच्या ओव्हर फ्लो झालेल्या तळ्याच्या सांडव्यातून पाणी वाहू लागले.
शहरातील पिंपळेश्वर महादेवाचे मंदिर शेजारील तळ्याला आलेल्या पाण्यामुळे पाण्यात गेले आहे. अनेक घरांत पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाले आहे. शेतीचेही या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या आठवड्यापासून आष्टी तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी सुरू आहे. गुरुवारी सकाळी सलग चौथ्या दिवशी आष्टी परिसरात पावसाने हजेरी लावली. सकाळी नऊ वाजता सुरू झालेला पाऊस दुपारी एक वाजेपर्यंत मुसळधार कोसळत होता.
या पावसाने आष्टी शहरातील भीमनगर तसेच दारूगल्ली या नदीकाठच्या भागासह इतरही अनेक भागांत पाणीच पाणी झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. शहराचे ग्रामदैवत पिंपळेश्वर महादेव मंदिराचे तळे यापूर्वीच भरलेले होते.
आजच्या पावसाने तळ्याचे पाणी मंदिराला टेकून मंदिर पाण्यात गेले. आष्टीपासून ५ किलोमीटरवर असलेल्या तालुक्यातील पांढरी परिसराला या पावसाचा जोरदार तडाखा बसला. शेतांमध्ये पाणी साचल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.
No comments:
Post a Comment