जामखेड प्रतिनिधी : १४ आॅक्टोबर
महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत
अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यातील पात्र लाभार्थी शेतक-यांच्या यादया गावातील ग्रामपंचायत, सोसायटी व संबंधित बँकेची शाखा येथे प्रसिदध करण्यात आलेल्या आहेत
तरी शेतकऱ्यांनी सदर ठिकाणी जाऊन आपल्या नावाची खात्री करावी तसेच ज्यांचे खाते आधार प्रमाणीत नाही त्यांनी पात्र शेतक-यांनी सदर यादीत आपले नाव तपासुन आपले आधार कार्ड व बँकचे पासबुक घेवुन आपल्या जवळच्या जिल्हा बँकेच्या शाखेत किंवा आपले सेवा केंद्रात आपले आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. सदर आधार प्रमाणिकरण करतेवेळी आपला आधार क्रमांक बचत, खाते क्रमांक अथवा लाभाची रक्कम तपासुन घेवुनच आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. असे आवाहन दे. अ. घोडेचोर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जामखेड यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ मधील प्रोत्साहनपर योजना जाहीर केली असुन सदर योजनेमध्ये जामखेड तालुक्यात एकुण ९४७० कर्जदार शेतक-यांची माहिती शासनास सादर करण्यात आलेली आहे. यापैकी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या अहमदनगर या सहकारी बँकेच्या एकुण ८०१६ व जामखेड तालुक्यात असलेल्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे १४५४ इतके शेतक-यांचा समावेश आहे. सदर योजनेअंतर्गत जामखेड तालुक्यातील ५४ गावांतील एकुण २८८८ पात्र शेतकरी सभासदांची प्रथम यादी शासनाकडुन या कार्यालयास व संबंधित बँकेस प्राप्त झाली आहे. सदर लाभार्थी शेतक-यांच्या यादया गावातील ग्रामपंचायत, सोसायटी व संबंधित बँकेची शाखा येथे प्रसिदध करण्यात आलेल्या आहेत
तरी पात्र शेतक-यांनी सदर यादीत आपले नाव तपासुन आपले आधार कार्ड व बँकचे पासबुक घेवुन आपल्या जवळच्या जिल्हा बँकेच्या शाखेत किंवा आपले सेवा केंद्रात आपले आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. सदर आधार प्रमाणिकरण करतेवेळी आपला आधार क्रमांक बचत, खाते क्रमांक अथवा लाभाची रक्कम तपासुन घेवुनच आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. सदर बाबत आपणास आपला आधार क्रमांक बचत,खाते क्रमांक अथवा लाभाची रक्कम मान्य नसल्यास अथवा चुकीची असल्यास आपली तक्रार तयार करुन घ्यावी. आधार प्रमाणिकरणासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे आधार प्रमाणिकरणासाठी कोणी शुल्काची मागणी केल्यास त्यास नकार दयावा. सर्व शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण लवकरात लवकर पुर्ण करुन घ्यावे जेणेकरुन प्रोत्साहनपर लाभाची रक्कम आपले खात्यावर लवकरात लवकर जमा करण्यात येईल. असे आवाहन जामखेड येथील दे. अ. घोडेचोर
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जामखेड यांचे कार्यालयाचे वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा