जामखेड प्रतिनिधी : २३ नोव्हेंबर
जामखेडकडून खर्ड्याकडे जात असलेला टँकर जामखेड तालुक्यातील राजुरी गावाजवळ मोटारसायकलस्वारचा बचाव करताना डिझेल व पेट्रोल असलेला टँकर पलटी झाला. यामुळे डिझेलची टाकी फुटल्याने महिलांसह नागरिकांनी जे सापडेल ते साधन हातात घेऊन डिझेल भरण्यासाठी एकच गर्दी केली होती. मात्र सुदैवाने पेट्रोलची टाकी शाबुत राहिल्याने मोठा अनर्थ टळला.
तर टँकरचा चालक नारायण सुभाष दहिफळे किरकोळ जखमी झाले.
सविस्तर असे की, जामखेडकडून भुमकडे चाललेला एम एच १६ बीसी १३१४ या क्रमांकाचा डिझेलचा टँकर मोटारसायकल स्वारचा बचाव करत असताना राजुरी गावाजवळ पलटी झाला.
टँकरचा ड्रायवर नारायण सुभाष दहिफळे वय ३१ हे किरकोळ जखमी झाले असुन त्यांना तातडीने उपचार करण्यासाठी दवाखान्यात रवाना करण्यात आले. टँकर पलटी झाल्यामुळे डिझेल टाकी फुटून सर्वत्र डिझेल वाहताना दिसत होते. ही बातमी कळताच काही लोकांनी हातात जे सापडेल ते घेऊन डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सुदैवाने पेट्रोलची टाकी शाबुत राहिल्याने अनर्थ टळला.
ही खबर मिळताच यावेळी राजुरी बीटचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन सगर यांनी त्वरीत घटनास्थळी भेट दिली. या वेळी वाहतुक शाखेचे पोलीस कॉ. गंगे, पोलीस देवढे, पो. कॉ. पालवे , पोलीस नाईक अजय साठे व तसेच राजुरी गावचे पोलीस पाटील दत्तात्रय मोरे, गावचे संरपच गणेश कोल्हे यांनी सहकार्य केले
No comments:
Post a Comment