जामखेड प्रतिनिधी : २३ नोव्हेंबर
जामखेड पोलीसांकडून जामखेड शहरातील अवैध मावा विक्री सेंटरवर छापामारी सुरू करण्यात आली असून आज दि. २३ नोव्हेंबर रोजी जामखेड शहरात नगर रोडवर शितल कलेक्शन शेजारी असलेल्या बागायतदार पानसेंटरवर (पानटपरी) अवैद्य मावा विक्री प्रकरणी कारवाई करत टपरीचालक ज्ञानेश्वर विष्णु बोराटे रा. बोराटे वस्ती जामखेड याचेवर .द.वि. कलम २७२, २७३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून अवैध मावा बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेशकुमार ओला यांनी जिल्ह्य़ातील अवैद्य धंदे बंद करण्याची मोहीम हाती घेतली असून त्यानुसार जामखेड पोलीसांनी अवैध धंद्यावर करावाई करण्यासाठी एक स्वतंत्र पथकच तयार केले आहे. हे पथक जामखेड शहरातील अवैध धंद्यावर करावाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बड़े यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, जामखेड शहरातील नगर रोड शितल कलेक्शन शेजारी बागायतदार पान टपरीमध्ये ज्ञानेश्वर विष्णु बोराटे रा. बोराटे वस्ती जामखेड हा इसम
महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला व संगंधी तंबाखू पासुन तयार केलेला मावा चोरुन विक्री करीत आहे. आत्ता गेल्यास मिळुन येईल. या बाबत खात्री वाटल्याने जामखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे यांनी
पोलीस हेडकॉन्टेबल लोखंडे यांना कारवाई कारवाई बाबत सर्व प्रक्रिया पूर्ण करून आज दिनांक २३/११/२०२२ रोजी दुपारी १६/०० वा. सुमा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे, पोलीस हेडकॉन्टेबल लोखंडे, पोलीस नाईक अजय साठे, पोलीस काॅन्स्टेबल देवडे यांच्या पथकाने शितल कलेक्शन शेजारी अवैद्य मावा विक्री प्रकरणी बागायतदार पानसेंटरवर (पानटपरी) जाऊन खात्री केली असता, एक इसम हा सुगंधी तंबाखु, सुपारीचा चुरा, यांचे हाताने मावा तयार करत असताना दिसला तेव्हा आमची व पंचाची खात्री झाल्याने आम्ही ठिक ४ : ४० वाजताचे सुमारास अचानक छापा टाकून ज्ञानेश्वर विष्णु बोराटे क्य ३५ वर्ष रा. बोराटे वस्ती जामखेड ता. जामखेड ताब्यात घेतले. तसेच त्याठिकाणी पांढ-या पिशवीमध्ये असलेला ४ किलो सुगंधी तंबाखू व सुपारीचा चुरा असलेले मिश्रण केलेला मावा असा रूपये २,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला यानुसार पोलीस काॅन्स्टेबल प्रविण कारभारी पालवे यांचे फिर्यादीवरून ज्ञानेश्वर विष्णु बोराटे विरुध्द भा.द.वि. कलम २७२, २७३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment