जामखेड /खर्डा प्रतिनिधी : २५ नोव्हेंबर
राष्ट्रीय छात्र सेना अर्थात NCC हे अतिशय शिस्तबद्ध व राष्ट्राचे भविष्य घडवणारी युनिफॉर्मधारी संघटना आहे. खर्डेकरांना एनसीसीची एकता आणि अनुशासनची स्वच्छता अभियानातून अनोखे दर्शन झाले. मी ही एक NCC कॅडेट आहे. असे मनोगत सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय छात्र सेनेची स्थापना नोव्हेंबर १९४८ साली झाली. २७ नोव्हेंबर २०२२ ला NCC च्या अमृत महोत्सव वर्षाची सुरवात होत आहे. NCC ही जगातील सर्वात मोठे युनिफॉर्मधारी संघटना आहे. भूदल, वायुदल, नौदल या आर्मीचे NCC युनिट आहे. या निमित्ताने १७ महाराष्ट्र बटालियन NCC अ. नगरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल चेतन गुरुबक्ष यांच्या आदेशानुसार व NCC ऑफिसर कॅप्टन गौतम केळकर, सेकंड ऑफिसर अनील देडे, थर्ड ऑफिसर मयूर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा (शिवपट्टण) येथे स्वच्छता अभियान व खर्डा शहरातून प्लास्टिक निर्मूलन जनजागृती रॅली संपन्न झाली.
जामखेड येथे स्वच्छता जनजागृती रॅलीचे उद्घाटन नायब तहसीलदार मनोज भोसेकर व प्राचार्य डोंगरे, एम. एल. प्राचार्य मोडके बी. के., प्राचार्य श्रीकांत होशींग, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बजरंग डोके, रमेश अडसूळ, रघुनाथ मोहोळकर, आप्पासाहेब पारखे यांच्या हस्ते करण्यात आले.
खर्डा शहरातून प्लास्टिक निर्मूलन जागृती, स्वच्छता अभियान रॅलीने खर्डा शहरात जनजागृती केली. यावेळी स्वच्छ खर्डा सुंदर खर्डा, एक कदम स्वच्छता की ओर, ऐतिहासिक वास्तूचे जतन करा, प्लॅस्टिक मुक्ती झालीच पाहिजे अशा घोषणेने खर्डा शहर दुमदुमून निघाले.
यावेळी खर्डा येथे प्लॅस्टिक निर्मूलन रॅलीचे स्वागत सरपंच आसाराम गोपाळघरे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल म्हसे, मदन गोलेकर प्राचार्य सोमनाथ उगले, दत्तराज पवार, अनिल धोत्रे, संतोष थोरात, क्रांतिवीर अकॅडमीचे संचालक मेजर रावसाहेब जाधव, प्रा. जावळेकर, पोलीस विभाग, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामध्ये जामखेड महाविद्यालय, ल. ना. होशिंग विद्यालय व रयतचे नागेश विद्यालय जामखेडच्या १५० एनसीसी छात्रांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
तसेच खर्डामध्ये सामाजिक संघटना, कार्यकर्ते, ग्रामस्थ व श्री संत गजानन कॉलेज खर्डा व हंबर्डे कॉलेज आष्टी जिल्हा बीड
यांनीही या स्वच्छता अभियान मध्ये सहभाग नोंदविला.
खर्डा किल्ल्यामध्ये NCC कॅडेटनी अनावश्यक गवत, केर कचरा, अनावश्यक झाडे झुडपे, प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा स्वच्छ एकत्रित करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. व श्री. क्षेत्र सिताराम गडावरील संपूर्ण गडाचे अनावश्यक प्लॅस्टिक कचरा संकलन करून योग्य विल्हेवाट लावली.
जामखेड चे नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांनी NCC ला 75 वर्षात पदार्पण करत आहे याबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या.
NCC च्या एकता व अनुशासनची स्वच्छता अभियानातून अनोखे दर्शन झाले. NCC च्या आव्हानाला खर्डेकरांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला व स्वच्छता अभियान मध्ये सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment