पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ५ एप्रिल
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील
बाबासाहेब रामभाऊ दराडे, (वय-६३) या शेतकऱ्यांने कर्जबाजारी पणास कंटाळून आपल्या राहते घराचे लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे.
याबाबत माहिती मिळताच तेव्हा मी लगेच शेतातून घरी गेलो असता. घरासमोर महिला व माझे नातेवाईक जमा झालेले होते. त्याच्या मदतीने माझे चुलते यांची मृतदेह खाली घेवुन प्राथमिक आरोग्य केंद्र, खर्डा येथे उपचाराकामी दाखल केले असता. त्यांनी तेथील कर्तव्यावर असणारे डॉक्टर यांनी ते मयत झाले बाबत घोषित केले. ते नेहमी सोसायटीचे कर्ज भरायचे पण माझ्याकडे पैसे नसल्याने मी भरू शकत नाही असे बोलत असत. कर्ज झाल्याचे नैराश्यातून त्यांनी गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. तरी पुढील तजवीज होणेस विनंती आहे. याबाबत विक्रम लक्ष्मण दराडे, वय- ३४ वर्षे. धंदा- शेती. रा. दरडवाडी, यांनी दिलेल्या खबरीवरून खर्डा पोलीस स्टेशनला आकस्मात नोंद करण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास खर्डा पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment