पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-५एप्रिल
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे पालकांचा आग्रह व विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन दांडेगावचे सुपुत्र प्रा. विकास भोगील यांनी खर्डा येथे शिव संस्कार इंग्लिश स्कूलची स्थापना मागील वर्षी केली. अल्पावधीतच विद्यार्थी व पालकांचा विश्वास संपादन केल्याने इंग्लिश स्कूलला जागा अपुरी पडू लागली त्यामुळे भूम रोड लगत सह्याद्री पेट्रोल पंपा समोर नवीन वास्तुत शिव संस्कार इंग्लिश स्कूलचा भव्य उदघाटन सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा भूमचे लोकप्रिय आमदार राहुल मोटे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी बोलताना प्राचार्या सौ.धनश्री भोगील व प्रा. विकास भोगील यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. खर्डा सारख्या ग्रामीण भागामध्ये उच्च दर्जाची इंग्लिश शिक्षण देणाऱ्या स्कूलची गरज होती व ती गरज या उभयतांनी पूर्ण केल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या सौ. धनश्री भोगील यांनी केले, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून खर्डा गावच्या सरपंच नमिता गोपाळघरे व छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. महेश गोलेकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमांमध्ये खर्डा शहरातील गणमान्य व्यापारी, उद्योजक, राजकीय सामाजिक क्षेत्रातील पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यात मा
कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र सुरवसे,सरपंच आसाराम गोपळघरे , मा.पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, वैजीनाथ पाटील ,तसेच भूम पंचायत समितीचे मा. सभापती अण्णासाहेब भोगील, युवा उद्योजक मिलिंद कांकरिया, राहुल कातोरे, हरिभाऊ केसकर, दांडेगाव सरपंच पांडुरंग भोगील यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फामदे सर व ढाकणे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. विकास भोगील यांनी केले.
No comments:
Post a Comment