पैठण-पंढरपूर पालखी मार्ग : धुळीचा त्रास, अपघाताच्या प्रमाणात वाढ, रस्ता व पुलांची अपुर्ण कामे तातडीने मार्गी लावण्याची होत आहे मागणी - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

बुधवार, ५ एप्रिल, २०२३

Home खर्डा शहर पैठण-पंढरपूर पालखी मार्ग : धुळीचा त्रास, अपघाताच्या प्रमाणात वाढ, रस्ता व पुलांची अपुर्ण कामे तातडीने मार्गी लावण्याची होत आहे मागणी

पैठण-पंढरपूर पालखी मार्ग : धुळीचा त्रास, अपघाताच्या प्रमाणात वाढ, रस्ता व पुलांची अपुर्ण कामे तातडीने मार्गी लावण्याची होत आहे मागणी

बुधवार, एप्रिल ०५, २०२३ खर्डा शहर,

पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ५ एप्रिल 
 पैठण-पंढरपूर या बहुप्रतीक्षित व बहुचर्चित पालखी मार्गावरील दिघोळ ते खर्डा दरम्यानचे रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून बंद अवस्थेत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने ही कामे त्वरित पूर्ण करावी अन्यथा नागरिक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचे दिसत आहे. .    
     जामखेड तालुक्यातील जातेगाव, दिघोळ, माळेवाडी, मोहरी, तेलंगशी, जायभायवाडी, धामणगाव, देवदैठण, नाहुली या गावांसह विविध ठिकाणांहून येणारे नागरिक व वाहनधारकांची मोठ्या संख्येने या मार्गावरून येजा चालू असते.
या भागातील शेतकरी हजारो लिटर दूध, तरकरी, शेतीमाल घेऊन खर्डा या ठिकाणी जातात. परंतु रस्ता खराब असल्यामुळे दुधासह शेतीमालाची नासाडी होते. दिघोळ, व जातेगाव वरून ये जा करणारे वाहनधारक व पदाचारी यांनाही या रस्त्याने जाणे नकोसे वाटते. दिंडीतील वारकरी तर रस्त्यावरून जाण्याऐवजी रस्ता व दिंडी सोडून डोंगराने आपली पायवाट करतात. त्यामुळे पहिलाच रस्ता बरा म्हणण्याची वेळ वाहन चालक व प्रवाश्यां वर आली आहे. 
   सन २०१५ ते २०१९ दरम्यान हे काम जलद गतिने सुरू होते. त्यानंतर या कामाची गती मंदावत गेली. हे काम कधी चालू तर कधी बंद अवस्थेत असते.  गेल्या ३ वर्षापासून हे काम पूर्ण बंद अवस्थेत असल्यामुळे प्रवाशांवर नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली. ना खासदार, ना आमदार, ना अधिकारी, ना ठेकेदार  अश्या कोणालाच याचे देणे घेणे नसल्याचे कामाच्या दिरंगाईमुळे दिसून येते. त्यामुळे या भागातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.  मध्यंतरी वन विभाग व काही शेतकऱ्यांनी रस्ता आडवा आडवीचे प्रकार केले होते. यावर तोडगा काढून संबंधित ठेकेदाराला पोलीस संरक्षणात रस्त्याचे काम सुरू करण्यास परवानगी दिली गेल्याचे कळते. परंतु ठेकेदाराचा अनुउत्साह दिसून आला. 
        दिघोळ ते खर्डा रस्त्यावरील सर्व पुलांचे कामे अपूर्ण अवस्थेत आहे. फुलावर मोठे खड्डे पडले आहेत. वाहन चालकांना अक्षरशा कसरत करावी लागते. अनेक वेळा वाहने खड्ड्यात पडण्याचे प्रकारही घडले आहेत. पावसाळ्यात तर रस्त्यावर वाहने  घसरून पडतात. हा रस्ता खराब असल्यामुळे रस्त्यावर आडवा आडवीचे प्रकारही घडतात. अनेक वेळा अधिकारी, आमदार, खासदार, यांच्याकडे मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता हे काम लवकर सुरू न झाल्यास जातेगाव, दिघोळ, माळेवाडी, मोहरी, जायभायवाडी, तेलंगशी, या भागातील सरपंच उपसरपंच वाहन चालक, प्रवासी, व नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
  गेल्या तीन-चार वर्षांपासूनपैठण पंढरपूर पालखी मार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत असूनयाचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो. खराब रस्ता असल्यामुळे जर अपघात झाला तर या परिसरात आरोग्य केंद्र नसल्यामुळे या भागातील रुग्ण, गरोदर महिला यांना तात्काळ उपचारासाठी खर्डा किंवा जामखेड येथे पोहोचणे जरुरीचे असताना खराब रस्त्यामुळे पोहोचण्यास उशीर होत असल्यामुळे अनर्थ घडल्यास याला जबाबदार कोण?  ठेकेदाराने पावसाळ्या पूर्वी काम सुरू करून पूर्ण करावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.
             सौ. दिपाली पांडुरंग गर्जे 
               माजी सरपंच ग्रामपंचायत, जातेगाव

गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी पासून पैठण ते पंढरपूर रस्त्याचे काम चालू आहे. वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पेशंट, विद्यार्थी, नागरिक ,महिला यांना धुळीचा त्रास होऊन आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे .रस्त्याचे अपूर्ण कामामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर संबंधित ठेकेदाराकडून काम चालू करून पूर्ण करून घ्यावे अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल.
        मच्छिंद्र गहीनाथ गिते
भाजपा गणप्रमुख, साकत गण
Tags # खर्डा शहर
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

खर्डा शहर
Posted at बुधवार, एप्रिल ०५, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels खर्डा शहर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

Popular Posts

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *