पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-४ एप्रिल
देशातील महिलांची आर्थिक उन्नती सुनिश्चित करण्यासाठी एक एप्रिल पासून पोस्ट ऑफिसमध्ये "महिला सन्मान बचत पत्र" सुरू करण्यात आले आहे. केवळ महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत ७.५ टक्के व्याजदराने गुंतवणूक करता येईल.
सदर योजना महिला व मुलींकरिता उपलब्ध आहे.
सदर बचत पत्राची मुदत दोन वर्ष राहील.
एका महिलेच्या नावावर किमान एक हजार व कमाल दोन लाखा पर्यंत कितीही गुंतवणूक करता येईल पण दोन गुंतवणूक मध्ये किमान तीन महिन्यांचे अंतर असले पाहिजे. गरज भासल्यास एक वर्ष झाल्यानंतर खात्यातील ४०% रक्कम एकदाच काढता येईल.
अधिक माहीतीसाठी आपल्या नजिकच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा असे आवाहन उपविभागीय डाक निरिक्षक अमित देशमुख यांनी केले आहे.
दिनांक ३ एप्रिल २०२३ रोजी जामखेड तालुक्यातील पहिले महिला सन्मान बचत पत्र घेण्याचा बहुमान रितिका जगदीश पेनलेवाड या एका वर्षाच्या मुलीला मिळाला. जामखेड डाकघर येथे अमित देशमुख अविनाश ओतारी, जगदीश पेनलेवाड लक्ष्मण काटे, बापूराव पंडित,राजकुमार कुलकर्णी, कालिदास कोल्हे, गोरख राजगुरू, दादासाहेब धस, आदिंच्या उपस्थितीत पहिले महिला सन्मान बचत पत्र वितरित करण्यात आले.
No comments:
Post a Comment