पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ३ एप्रिल
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जैन धर्मीय बांधवावतीने विविध उपक्रमाद्वारे महावीर स्वामींची २६२२ वी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
या जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन प्रसिद्ध व्यापारी कांतीलाल खिंवसरा, किशोर कांकरिया, अवि शहा, सुखानंद शहा, राजन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
महाविर स्वामीनी संपूर्ण जगाला "जिओ और जिने दो" हा दिव्य संदेश दिला असुन हा दिवस अहिंसा दिन म्हणुन गौरविला जातो.
अशा महान महावीर स्वामींच्या जयंतीनिमित्त खर्डा येथील जैन मंदिरापासून सकाळी ८ : ०० वाजता महावीर स्वांमीची प्रतिमा पालखीत ठेवून भव्यदिव्य मिरवणुकीस सुरूवात काढण्यात आली या मिरवणुकीत शेकडो महिला पुरूषाचा सहभाग होता. या दरम्यान स्वामी महावींराच्या घोषणानी संपुर्ण शहर दुमदुमून गेले होते. शहरात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून व फूंलांचा वर्षाव करून पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी कांकरिया, खिंवसरा बांधुनी उपस्थितांना आइस्क्रीम, मिठाईचे वाटप केले. यानंतर सकाळी ११:०० वाजता मिरवणूक मंदिरात पोहचली. या वेळी प्रदिप शहा, सचिन कुरुमुडे, बाबळे बंधु यांनी महाप्रसादाचे वाटप केले.
देशावर परत कोरोना आजाराचे संकट येऊ नये यासाठी जैन धर्मियांच्या वतीने याठिकाणी प्रार्थना करण्यात आली. शेवटी मिलन कांकरिया यांनी सर्वांचे आभार मानले
देशावर परत कोरोना आजाराचे संकट येऊ नये यासाठी जैन धर्मियांच्या वतीने याठिकाणी प्रार्थना करण्यात आली. शेवटी मिलन कांकरिया यांनी सर्वांचे आभार मानले
No comments:
Post a Comment