पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२० ऑगस्ट
जामखेडचे ग्रामदैवत नागेश्वराच्या पावनभूमीत व यात्रेनिमित्त जामखेड येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी कै. विष्णू वस्ताद काशीद (बाबा) यांच्या स्मरणार्थ भव्य विराट निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कुस्त्यांबरोबरच कुस्तीमध्ये प्राविण्य मिळवलेल्या सन्माननीय व्यक्ती, तसेच पैलवान यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
मंगळवार दि. २२ आॅगस्ट रोजी जामखेड येथील ल. ना. होशिंग विद्यालयात दुपारी १:०० वाजताचे सुमारास होणाऱ्या या निकाली व जंगी कुस्ती मैदानाचे अध्यक्ष माजी मंत्री तथा विधान परिषदे आमदार प्रा. राम शिंदे तर हे कुस्ती मैदान ह.भ.प.महादेवानंद भारती महाराज (अश्वलिंग संस्थान,पिंपळवंडी) तसेच प.पू.संत श्री.1008 महामंडलेश्वर दादोजी महाराज इंदोर यांच्या आशीर्वादाखाली संपन्न होणार आहे.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून खा. डॉ. सुजय विखे आ. सुरेश धस, आ. रोहित पवार आ. बाळासाहेब आजबे (आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कुस्ती मैदानामध्ये कुस्तीमध्ये प्राविण्य मिळवलेल्या सन्माननीय व्यक्ती, तसेच पैलवान यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. यामध्ये जागतिक पोलीस व फायर गेम विजेते पै. विजय चौधरी (DYSP), पै. राहुल आवारे (DYSP), पै. नरसिंग यादव (DYSP), पै. रोहित पटेल (हिंद केसरी) तसेच आशियाई कुस्ती स्पर्धेतील चॅम्पियन पै.मा.सुजय तनपुरे यांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी होणाऱ्या जंगी कुस्ती मैदानाचे हे २१ वे वर्ष असून, यासाठी राज्य, आंतरराज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या पैलवानांमध्ये महत्त्वाच्या कुस्त्या होणार आहेत. मध्य प्रदेश, हरियाणा व पंजाब या राज्यातील नामांकित पैलवान या मैदानासाठी उपस्थित राहून कुस्त्या खेळणार आहेत. कुस्ती शौकीनांसाठी ही पर्वणी असून याचा लाभ घ्यावा.
सालाबाद प्रमाणे या विराट निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन अध्यक्ष, मराठा भाषिक संघ, मध्यप्रदेश युवराज काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपमहाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र बबन काशीद यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य अशा स्वरूपात संपन्न होणार आहेत. तरी या भव्य विराट निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानासाठी सर्व कुस्तीप्रेमींनी, व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कुस्ती मैदानाची शोभा वाढवावी, असे आवाहन या भव्य कुस्ती मैदानाचे आयोजक भाजपा तालुकाध्यक्ष तथा सारोळा गावचे सरपंच अजय काशीद यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा