पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -६ मे
जामखेड तालुक्यातील चोंडी विविध कार्यकारी सेवा संस्था अध्यक्ष विलास आजीनाथ जगदाळे या आरोपीने दि. १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०२३ या सात वर्षांच्या कालावधीत तब्बल १० लाख २४ हजार ८१८ रुपयांची देखभाल-दुरुस्ती खर्चाची बनावट बिले तयार करून पैशांचा अपहार केल्याची फिर्याद लेखापरीक्षक मुकेश मारुती वडीयार यांनी बुधवारी दि. ३ मे रोजी जामखेड पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार जामखेड पोलिसांनी ४२० सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्याची कार्यवाही केली आहे.
याबाबत मुकेश मारुती वडीयार (लेखापरीक्षक श्रेणी १. सहकारी संस्था) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, जामखेड तालुक्यातील चोंडी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष विलास अजिनाथ जगदाळे यांनी पदाचा गैरवापर करून १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०२३ या सात वर्षांच्या कालावधीत देखभाल खर्चाची बनावट बिले तयार करून खर्ची टाकून १० लाख २४ हजार ८१८ रुपयांचा अपहार केला आहे. त्यानुसार सहकारी संस्था श्रेणी १ चे लेखापरीक्षक मुकेश मारुती वडीयार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोंडी सेवा सोसायटी अध्यक्ष तथा आरोपी विलास आजीनाथ पोलिसांनी भादंवि कलम ४२०, ४०९, ४६७, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती अधिक तपास करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा