पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ७ मे
जामखेड तालुक्यातील खर्डा येथून जाणाऱ्या व पालखी मार्गाला येऊन मिळणाऱ्या तेलंगशी फाटा ते ढाळे वस्ती हे डांबरी रस्ता दुरुस्तीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. हे होत असलेले
निकृष्ट काम मनसे पदाधिकारी, सरपंच,कार्यकर्त्यांनी बंद पाडले असून होत असलेल्या निकृष्ठ कामाबद्दल संबंधित ठेकेदाराला विचारणा केली असता ठेकेदाराने उध्दट उत्तरे दिली. या कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी तसेच काम दर्जेदार करावे अशी मागणी मनसे चित्रपट सेना जिल्हा अध्यक्ष बाबुराव जायभाय, तेलंगशी गावचे सरपंच कांतीलाल जाधव, गणेश गायकवाड, सुहास जायभाय, नितीन ढाळे, यांनी केली आहे.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथून जाणाऱ्या पैठण पंढरपूर या पालखी मार्गाला येऊन मिळणाऱ्या तेलंगशी फाटा ते ढाळे वस्ती दरम्यान साधारण एक ते दीड
किलोमीटरचे डांबरी रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्या कामावर ठेकेदाराकडून मुरूमा ऐवजी माती वापरली जात असे तसेच खडीही योग्य आकाराची वापरली जात नसल्याचे दिसुन आल्याने मनसे चित्रपट सेना जिल्हा अध्यक्ष बाबुराव जायभाय, तेलंगशी गावचे सरपंच कांतीलाल जाधव, गणेश गायकवाड, सुहास जायभाय, नितीन ढाळे, आदी कार्यकर्त्यांनी निकृष्ट काम होत असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली व ते काम बंद पाडले.व काम निकृष्ट होत असल्याबद्दल व ते चांगले व्हावे यासाठी ठेकेदाराशी संपर्क केला असता त्याने उध्दट उत्तरे दिली.

No comments:
Post a Comment