पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ७ मे
जामखेड तालुक्यातील खर्डा येथून जाणाऱ्या व पालखी मार्गाला येऊन मिळणाऱ्या तेलंगशी फाटा ते ढाळे वस्ती हे डांबरी रस्ता दुरुस्तीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. हे होत असलेले
निकृष्ट काम मनसे पदाधिकारी, सरपंच,कार्यकर्त्यांनी बंद पाडले असून होत असलेल्या निकृष्ठ कामाबद्दल संबंधित ठेकेदाराला विचारणा केली असता ठेकेदाराने उध्दट उत्तरे दिली. या कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी तसेच काम दर्जेदार करावे अशी मागणी मनसे चित्रपट सेना जिल्हा अध्यक्ष बाबुराव जायभाय, तेलंगशी गावचे सरपंच कांतीलाल जाधव, गणेश गायकवाड, सुहास जायभाय, नितीन ढाळे यांनी केली आहे. या मागणीमुळे ठेकेदार वठणीवर आला असून त्याने मुरूमाऐवजी टाकलेली माती बाजूला काढून त्या ठिकाणी नियमानुसार मुरूम टाकायला सुरुवात केली आहे. यामुळे पदाधिकारी, सरपंच व कार्यकर्ते यांच्या मागणी यश आले आहे. काम चांगले होत असल्याने हा रस्ता दर्जेदार होणार असल्याचे समाधान या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
जामखेड तालुक्यातील सर्वात जलद न्युज नेटवर्क असलेल्या पोलीस वारंट न्युज नेटवर्क वर बातमी प्रसिद्ध होताच कामात झालेल्या सुधारणेमुळे पोलीस वारंटचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment