पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ६ एप्रिल
खर्डा येथील रहिवासी व नगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले हवालदार गोरक्षनाथ शिवदास लोखंडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. दिवंगत लोखंडे पोलीस दलात २७ वर्षापासून कार्यरत होते.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील स्वातंत्र सैनिक शिवदास लोखंडे यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. गोरक्षनाथ लोखंडे यांचा सामाजिक वारसा जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. कर्जत पोलीस स्टेशन येथे कार्यरत असतांना त्यांनी गोदड महाराज मंदिराचा कळस चोरीचा अल्पावधीत तपास करत चोरांकडून मुद्देमाल हस्तगत केला होता. या कामगिरीमुळे पोलीस दलाकडून गोरक्षनाथ लोखंडे यांचा विशेष गौरव करण्यात आला होता. तसेच खर्डा येथील चौंडेश्वरी नवरात्र उत्सव मंडळाची स्थापना करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. मनमिळावू, सर्वांना सोबत घेऊन चालणारे त्यांचे व्यक्तमत्व होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिण, पत्नी, दोन मुले असा मोठा परिवार आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य प्रतिनिधी मच्छिंद्र लोखंडे यांचे ज्येष्ठ बंधू होते. मुत्यूसमयी त्यांचे वय ५२ वर्षे होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पोलीस दलासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment