पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१० जानेवारी
जामखेड येथील डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य विकी धर्मेंद्र घायतडक यांना शैक्षणिक क्षेत्रात इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिक्षा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्लोबल स्कॉलर फाऊंडेशन पुणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पद्मश्री सुधाकर ओलवे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. राज्य स्तरीय गोवा, गुजरात, राजस्थान, तमिळनाडू या पाच राज्यातून पुरस्कारार्थी निवडला जातो. हा पुरस्कार मिळाले बद्दल प्रा. विकी घायतडक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यापूर्वी घायतडक यांना अध्यक्ष : पीपल्स वेल्फेअर फाउंडेशन, समाज भूषण पुरस्कार २०२२, आदर्श अभियंता पुरस्कार २०२१, टीचर्स इंनोवेशन अवॉर्ड दिल्ली २०१९, धम्म पुरस्कार २०१२, कॉम्प्युटर इंजिीअरिंगमध्ये कॉम्पुटर सेक्युरिटी या विषयावर संशोधन सुरू असे विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment