पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-९ जानेवारी
पत्रकारिता हे मोठे कठीण काम आहे. कोणतेही राजकीय पदाधिकारी किंवा सरकारी अधिकारी असोत त्यांच्यावर पत्रकारांचा एक आदरयुक्त दबाव असतो. या दबावातून सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लागतात. खर्डा येथील सर्वच पत्रकार आपल्या आपल्या पद्धतीने चांगलेच काम करत आहेत. खर्डा ग्रामपंचायत अंतर्गत काम करताना आम्हालाही चांगल्या प्रकारचे सहकार्य करत असतात. यापुढे पत्रकारांनी असेच काम करत राहावे असे मनोगत सरपंच सौ. संजविनी पाटील , माजी उपसरपंच श्रीकांत लोखंडे , सोपान गोपाळघरे , महालिंग कोरे यांनी आपले मत व्यक्त करत पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या
यावेळी सरपंच सौ. संजविनी वैजीनाथ पाटील ,ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, बाजार समिती संचालक वैजीनाथ पाटील , माजी सरपंच आसाराम गोपाळघरे ,ग्रामपंचायत सदस्य मदन पाटील ,दीपक जावळे ,महालिंग कोरे, सोपान गोपाळघरे , राजू मोरे , गणेश शिंदे , महेश दिंडोरे ,वैभव जमकावळे , विकास शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार संतोष थोरात , श्वेता गायकवाड, तुळशीदास गोपाळघरे , धनसिंग साळुंखे,किशोर दुषी दत्तराज पवार , बाळासाहेब शिंदे आदींसह कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
मराठी पत्रकार सृष्टीचे जनक अद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन शासनाने पत्रकार दिन म्हणून घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त खर्डा येथील सरपंच संजविनी पाटील यांनी खर्डा ग्रामपंचायत येथे पत्रकार दिन साजरा करत सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पत्रकारांच्यावतीने पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता बापूसाहेब गायकवाड , बाळासाहेब शिंदे , संतोष थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्वांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते यांनी व्यक्त केले.
तसेच सर्व पत्रकारांच्या वतीने खर्डा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.संजीवनी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून व भेट वस्तू देऊन त्यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
चौकट
खर्डा येथील सर्व पत्रकारांचा पोस्ट खात्यामार्फत दहा लाख रुपयांचा विमा उतरविण्याचा निर्णय आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी घेतला असल्याचे प्रतिपादन खर्डा सरपंच संजीवनी पाटील यांनी यावेळी सांगितले
No comments:
Post a Comment