पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ९ जानेवारी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील महावितरण कंपनीच्या उपकेंद्रात सक्षम व प्रामाणीक अधिकाऱ्यांची नेमणुक करावी तसेच मागील ७० वर्षापुर्वीच्या जुन्या व जिर्ण झालेल्या लाईटच्या तारा व पोल त्वरीत बदलावेत या शिवाय निवेदनात केलेल्या इतरही मागण्या मान्य करून त्यावर तातडीने कार्यवाही करावी अन्यथा दि. १७ जानेवारी २०२४ रोजी अहमदनगर येथील महावितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा शिवपट्टण युवा मंच खर्डा यांच्यावतीने संतोष गोविंद साबळे, बबलु सुरवसे यांनी महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
आज दि. ९ जानेवारी रोजी शिवपट्टण युवा मंच खर्डा यांच्या वतीने महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १) खर्डा हे खात्यांतर्गत शिक्षा झालेल्या कर्मचाऱ्यांचे बदलीचे ठिकाण म्हणुन ओळखले जाते त्यामुळे याठिकाणी प्रामाणीक अधिकाऱ्यांची नेमणुक केली जात नाही. गेल्या दहा वर्षापासुन अधिकारी कोण आहे? याची सुध्दा कल्पना नागरिकांना नाही. खर्डा शहरातील विज वाहिन्या (तारा) व लोखंडी पोल किमान ७० वर्षांपासुन बदललेले नाहीत त्यामुळे तारा जीर्ण व पोल जमीनीच्या आत सडलेले आहेत. त्यामुळे तारा तुटण्याचे प्रमाण जास्त आहे. डि. पी. ना फ्युजेस नसल्याने बऱ्याच वेळेस विज वाहिन्या तुटल्यावर विज पुरवठा खंडीत होत नाही. या अगोदर खुप वेळेस जिवीत हाणी होता होता टळलेली आहे. तसेच शहरातील विजवितरणच्या कामांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी एजन्सी कार्यरत नसल्याने किरकोळ कारणांमुळे सहा सहा तासविजपुरवठा खंडीत राहतो. फिडर क्रॉसींग, आवश्यक त्या ठिकाणी ए.बी. स्वीचेस नसल्याने वारंवार होणारे मानवी अपघात यामुळे नागरिकांसह कर्मचाऱ्यांनाही जीव मुठीत धरुन काम करावे लागत आहे. विजबील देखभाल दुरुस्ती व इतर ऑफीसची कामे स्थानिक होत नाहीत ती स्थानिक पातळीवर व्हावीत. या सर्व बाबींची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही अन्यथा दि. १७ जानेवारी २०२४ रोजी
महावितरण कंपनीच्या अहमदनगर येथील अधिक्षक अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा शिवपट्टण युवा मंच खर्डा यांच्यावतीने संतोष गोविंद साबळे, बबलु सुरवसे यांनी दिला आहे.
याबाबतचे रितसर निवेदने महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, उर्जा मंत्री, जिल्हाधिकारी, अधिक्षक अभियंता, उपकार्यकारी अधिकारी कर्जत, सहाय्यक अभियंता जामखेड व तहसिलदार, जामखेड यांना पाठविण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment