खर्डा प्रतिनधी:२५सप्टेंबर
जामखेड तालुक्यातील सर्वात मोठा खैरी मध्यम प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी पुढे झेपावले आहे.
आमदार रोहित पवार यांच्या हस्ते विधिवत पूजा करून जलपूजन करण्यात आले. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
खैरी मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता ही ५३३.६० द.श.ल.घ.फूट आहे या प्रकल्पामुळे या भागातील उसाचे क्षेत्र वाढले असल्याने खर्डा येथील बाजारपेठेमध्ये अर्थचक्र वाढण्यास फार मोठी मदत होऊन लाखो रुपयांची उलाढाल व्यापारी पेठेमध्ये होत असते, त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण झाले आहे
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांची एक इंच ही जमिनीचे नुकसान न होता खैरी मध्मम प्रकल्पाच्या सांडव्याची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी उपस्थिती लघु पाटबंधारे उपविभाग जामखेडचे उपविभागीय अधिकारी उमेश कंगनकर, शाखा अधिकारी गणेश काळे, कनिष्ठ अभियंता रामभाऊ ढेपे, प्राध्यापक मधुकर राळेभात, खर्ड्याचे सरपंच आसाराम गोपाळघरे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, आजिनाथ लटके, मोहन भोसले, चंद्रकांत गोलेकर ,महालिंग कोरे, प्रकाश गोलेकर, कपिल लोंढे, राजू सय्यद,हरिभाऊ गोलेकर, आश्रू खोटे, मच्छिंद्र भोसले इत्यादी सह परिसरातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment