पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१८ मे
जामखेड येथील नगर रोडवरील आग विझवण्याच्या फायरबॉल बनवणाऱ्या वर्कशॉपमध्ये आग लागुन तिथे काम करत असणाऱ्या दोन कामगारांचा त्यात होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस विभागाच्या वतीने केलेल्या तपासानुसार आरोपीने त्याने भाडेतत्वावर घेतलेल्या गोडाऊनमध्ये कामगारांच्या संरक्षणाची पुरेसी उपाययोजना केलेली नव्हती नमुद गोडाऊनला संकटकालीन मार्ग नव्हता. तसेच कामगारांना काम करण्यासाठी सेफ्टी किट उपलब्ध करुन दिलेले नव्हते. तसेच इलेक्ट्रीक बोर्डाजवळ लघु विद्युत मंडल खंडक (एम.सी.बी.) बसवलेले नव्हते. त्यामुळे इलेक्ट्रीक शॉट सर्किट झाल्यामुळे गोडाऊन मधील पुढे, ज्वालागृहि पदार्थ, इतर साहित्य यानी पेट घेतल्याने भडकलेल्या आगीत यातील मयतांचा (कामगारांचा) मृत्यु झाला आहे. तसेच यातील जखमी (कामगार) गंभीर जखमी झाले आहेत. म्हणुन यातील फिर्यादी यांची रविंद्र सुर्यभान शेळके रा. जामखेड विरुध्द पोलीस काॅन्स्टेबल सचिन चंद्रकांत देवढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादवि कलम 304, 336 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड येथील नगर रोडवरील आग विझवण्याच्या फायरबॉल बनवणाऱ्या गोडाऊन मध्ये आग लागुन तिथे काम करत असणाऱ्या दोन कामगारांचा त्यात होरपळून मृत्यू झाला.
तर दोन जण जखमी झाले होते. . या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. सदर घटनेबाबत पोलीस विभागाकडून गांभीर्यपूर्वक पावले उचलली जात असून घटनास्थळावरील नमुने घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या फाॅरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले होते. तसेच याबाबत तपासणी व आवश्यक त्या सर्व बाबींची पडताळणी करून गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली आहे.
या घटनेत ज्ञानेश्वर चंद्रकात भोोंडवे (वय ४५), घोडेगाव. ता. जामखेड व जहिर अब्दुल सत्तार मुल्ला (वय ४२) रा. तेरखेडा ता. वाशी जि. उस्मानाबाद या २ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.
या घटनेत ज्ञानेश्वर चंद्रकांत भोंडवे वय ४३ वर्षे रा. घोडेगाव, ता. जामखेड, जि. अहमदनगर व जहिर अब्दुल सत्तार मुल्ला वय ४२ वर्षे रा. तेरखेडा, ता. वाशी जि. उस्मानाबाद यांचा मृत्यू तर सौ.पुजा भाऊराव पठाडे वय २३ वर्षे रा. हरीनारायण आष्टा, ता. आष्टी, जि.बीड १) सचिन लहु पवार वय २३ वर्षे रा. सुतारगल्ली, जामखेड, ता. जामखेड, हे दोघे जखमी झाले आहेत.
या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती हे करत आहेत
No comments:
Post a Comment