पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१७ जून
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या सारोळा जिल्हा परिषद शाळेत गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी राबवलेल्या संकल्पनेची संपुर्ण तालुक्यात मोठी चर्चा झाली. दि. १५ जून २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा येथे इयत्ता पहिलीच्या च्या दाखलपात्र विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्वतयारी मेळावा व प्रवेशोत्सव उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
यावेळी इयत्ता पहिली दाखल पात्र विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये बैल गाडीतून व घोड्यावर बसून इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या नविन मुलांची मिरवणूक गावामधून काढण्यात आली. यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक सहभागी झाले होते. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, गणवेश व पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थांना स्वादिष्ट व रुचकर गोड जेवण देण्यात आले. तसेच जिल्हाअंतर्गत बदलीने सारोळा शाळेत नव्याने हजर झालेले शहाजी जगताप, माजिद शेख, श्रीमती. शबाना शेख यांचे शाळेच्या व गावच्या वतीने स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सारोळा गावचे सरपंच अजय (दादा) काशिद यांनी विशेष परिश्रम घेतले तर माजी सरपंच हरिभाऊ ढवळे, ग्रामपंचायत सदस्य किरण मुळे,बापूराव तांबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर सातपुते, माजी उपाध्यक्ष देविदास पवार, शाळेतील शिक्षक सोळंके सर, होळकर सर, श्रीम.रसाळ मॅडम, सर्व पालक व विद्यार्थी उपस्थित होते
No comments:
Post a Comment