पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२८जुलै
नगर-सोलापूर महामार्गावरील कर्जत तालुक्यातील कोकणगाव बायपासजवळ पंचर झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या पिकअप आणि आयशर टेम्पो यांचा भीषण अपघात झाला. यामध्ये पिकअपचा चालक ठार झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मयूर भगवान मोरे (रा. जामखेड) हा त्याच्या ताब्यातील पिकअप (क्र. एमएच १६ सीडी ५४३१ ) हा नगरकडून मिरजगावच्या दिशेने घेऊन जात होता.
तो नगर-सोलापूर महामार्गावरील कर्जत तालुक्यातील कोकणगाव बायपासजवळ आला असता पिकअपचे टायर पंचर झाल्याने त्याने पिकअप महामार्गाच्या बाजूला थांबवला व त्यानंतर पंचर झालेले टायर काढण्यासाठी तो पिकअपच्या समोरच्या बाजुला गेला व चाक काढत होता.
दरम्यान याचवेळी नगरकडून मिरजगावच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पो (एमएच १८ बीजी १३८०) ने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या पिकअपला जोरदार धडक दिली.
यावेळी पिकअपचे पंचर काढणारा मयूर भगवान मोरे जागीच ठार झाला. तसेच या अपघातानंतर आयशर टेम्पो देखील रस्त्याच्या खाली जाऊन पडला.
या घटनेची माहिती समजताच मिरजगाव येथील सोनू बागवान, तसेच जीवन ज्योती रुग्णवाहिकेचे लहू बावडकर तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी मोरे यास मिरजगाव येथील आरोग्य केंद्रामध्ये आणले व मिरजगाव पोलीस दूरक्षेत्राशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली.
No comments:
Post a Comment