नवनियुक्त खासदारांचा नागरी सत्कार, मतदारसंघातील विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण,आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

बुधवार, ३१ जुलै, २०२४

Home राजकीय बातम्या नवनियुक्त खासदारांचा नागरी सत्कार, मतदारसंघातील विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण,आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन

नवनियुक्त खासदारांचा नागरी सत्कार, मतदारसंघातील विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण,आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन

बुधवार, जुलै ३१, २०२४ राजकीय बातम्या,
पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२५ जुलै

 अत्यंत संघर्षाच्या काळात लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' पक्षाचे नवनियुक्त खासदार डॉ.अमोल कोल्हे (शिरुर), निलेश लंके (अहिल्यानगर), धैर्यशील मोहिते पाटील (माढा) या खासदारांचा कर्जत जामखेड मतदारसंघाच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पणही होणार आहे. आमदार रोहित पवार यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले आहे.

  ही लोकसभा निवडणूक अत्यंत कठीण होती, नेते विरोधात गेले होते पण जनता आणि कार्यकर्ते आदरणीय पवार साहेब यांच्यासोबत होते. अशा कठिण काळात झालेल्या या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तीनही उमेदवार घवघवीत मतांनी निवडून आले. याबद्दल त्यांचे कर्जत जामखेड शहराच्या वतीने आमदार रोहित पवार यांनी नागरी सत्काराचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम मिरजगावमध्ये वखार महामंडळ गोडाऊन समोर शुक्रवारी (२ ऑगस्ट) दुपारी २ वाजता  होणार आहे.

आमदार रोहित पवार यांनी मोठ्या पाठपुराव्यातून काम पूर्ण केलेल्या मिरजगाव, निमगाव डाकू व बिटकेवाडी या ४२ किलोमीटरच्या रस्त्याचे लोकार्पणही यावेळी करण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे स्थानिक भागातील शेतकरी, नागरिक, विद्यार्थी, व्यवसायिक, स्थानिक बाजारपेठेला दळणवळणाच्या दृष्टीने फायदा होणार आहे. तसेच मिरजगाव येथील कर्जत जामखेड मतदारसंघातील तिसऱ्या ५० खाटांच्या अद्ययावत सेवा पुरवणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. हे रुग्णालय मिरजगावमध्ये असल्यामुळे परिसरातील गावांना याचा फायदा होणारच आहे शिवाय नगर-सोलापूर रस्ता हा मिरजगावमधून जात असल्याने या भागात अपघात झाल्यानंतर जखमींना उपचार करण्यासाठी हे रुग्णालय उत्तम पर्याय आहे. यासाठी आमदार रोहित पवार यांनी ५० खाटांच्या या रुग्णालयाला मंजूरी मिळवून आणली आणि त्यासाठी १३ कोटी ६४ लाख रुपये निधीही आणला आणि अशाप्रकारचे तीन उपजिल्हा रुग्णालय असलेला हा राज्यातील मोजक्या मतदारसंघापैकी एक मतदारसंघ आहे. याशिवाय आमदार रोहित पवार यांनी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने गेल्यावर्षी मतदारसंघातील १० हजार गरजू विद्यार्थ्यांना ज्यांना ३ किलोमीटर पेक्षा जास्त अंतर शाळेत चालत यावे लागते अशा विद्यार्थ्यांना १० हजार सायकलचे वाटप करण्यात आले होते. तशाच पद्धतीने आणखीही काही विद्यार्थ्यांनी मागणी केली, त्यानूसार योग्य नियोजन करून आणखी ४ हजार विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येणार आहे.

कोट

"कर्जत जामखेड मतदारसंघाच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्वाचा आहे. नवनियुक्त खासदारांच्या सत्कार समारंभासाठी आणि आपल्याच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्वाच्या असलेल्या या कार्यक्रमासाठी यजमान म्हणून आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, ही विनंती."

रोहित पवार
(आमदार, कर्जत-जामखेड)
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at बुधवार, जुलै ३१, २०२४
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या
    जामखेड प्रतिनिधी –21ऑक्टोबर चाकूचा धाक दाखवून एका कामगाराच्या फोनपे खात्यातून ८ हजार ५० रुपये हस्तांतरित करून त्याला लुटणाऱ्या...
  • लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक
    जामखेड प्रतिनिधी/१९ ऑक्टोबर२०२५ जामखेड तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीचे युवा आणि विकासाभिमुख सरपंच रघुनाथ पंढरीनाथ परकड हे आगा...
  • मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!
    जामखेड प्रतिनिधी/ 22ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे गंभीररीत्या बाधित झालेल्या मोहरी लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झा...
  • समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन
    जामखेड प्रतिनधी/२१ऑक्टोबर२०२५ जामखेड 11 नंबर वॉर्डमधील नगरपरिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यकर्ते पै.सागर भाऊ टकले य...
  • खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
    खर्डा,प्रारतिनधी /17जून2025 जामखेड तालुक्यातील खर्डा येथील न्यु इंग्लिश स्कूलजवळ आज दिनांक 17 जून, 2025 रोजी दुपारी 1:10 वाजता आ...
  • “‘माझ्या तब्येतीपेक्षा गावाच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा’ — भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांच्या संवेदनशीलतेला सभापती राम शिंदेंचा तत्काळ प्रतिसाद,मोहरी तलाव दुरुस्तीचा मार्ग मोकळा; सभापती शिंदेंकडून जलसंपदा विभागाला तातडीचे आदेश
    खर्डा प्रतिनिधी / १६ ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे भराव वाहून गेलेल्या मोहरी तलावाचा ज्वलंत प्रश्न आता मार्गी लागणार आहे. भाजपा नेते व ...
  • जामखेड तालुक्यातील १६ वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास; प्रेमीयुगुलीच्या आत्महत्येची घटना उघडकीस..पुण्यातील खडकवासला धरणाजवळ दोघांचे मृतदेह आढळले
    जामखेड प्रतिनधी/11जुलै2025 महादेव नगर, मांजरी येथील एका १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर केलेल्या शोधात आज सक...
  • खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी
    खर्डा, १८ जून 2025 जामखेड तालुक्यातील खर्डा शहरातील वार्ड क्रमांक १ मधील पारधी वस्तीतील नागरिक आपल्या त्वरित नागरी सुविधांसाठी...
  • दि .18 जूनपर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन सर्वेमध्ये सहभाग घ्या ; बाजीराव गोपाळघरे यांचे जामखेड तालुक्यातील नागरिकांना आवाहन
    जामखेड प्रतिनधी/१५जून २०२५ जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये, घरकुला पासून वंचित असलेल्या नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेस...
  • अहिल्यानगर-सोलापूर मार्गावर स्थानिकांना टोलमाफी आणि अंडरपास/ओव्हरपासच्या मागणीची केंद्राकडून दखल,आमदार रोहित पवार यांनी केली होती मागणी
    पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१३सप्टेंबर अहिल्यानगर-करमाळा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना टोलमाफी आणि सुरक्षिततेच्या दृष्...

Popular Posts

खर्डा शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती विविध उपक्रमांनी साजरी

धक्कादायक हत्या: चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची कुऱ्हाडीने सपासप वार करत केली हत्या; नंतर आत्महत्येचा प्रयत्न

जामखेडच्या खताच्या दुकानात मोठी चोरी, ३ लाखांचा माल गायब

खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

आ. रोहित पवार यांच्याकडून स्वखर्चातून मोहरी तलावाच्या दुरुस्तीची तयारी, कुकडी व सीना कालवा आणि बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाकडे निधीची मागणी,जलसपंदा विभागाने दिले कार्यवाहीचे आदेश

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

खर्डा परिसरात अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला– रहस्यमय घटनेचा तपास सुरू, परिसरात एकच खळबळ

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

गाव चलो अभियानांतर्गत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी वाळकीत केला मुक्काम

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *