पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१३नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा शहराचे वैभव असलेल्या मराठ्यांच्या विजयाचे प्रतिक किल्ले शिवपट्टण येथे शिवप्रेमी व पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे पर्यटनतुन स्थानिक व्यावसायिकांना फायदा देखील होत आहे. असे असताना देखील किल्याच्या गेटवर बेकायदेशीर पणे एक महिला तसेच तरुण किल्ला पाहण्यासाठी येणारे पर्यटक व शिवप्रेमींकडुन जबरदस्तीने पैसे मागत आहे. जर पर्यटकांनी पैसे दिले नाही तर शिवीगाळ केली जाते. तसेच कुठलीही पैशाची पावती दिली जात नाही. यांची गंभीर दखल घेउन योग्य ती कार्यवाही करावी. अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका अध्यक्ष पांडुराजे मधुकर भोसले व खर्डा येथील धारकऱ्यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी तहसिलदार जामखेड यांना याबाबत रितसर निवेदन दिले असून सदर निवेदनात पुढे म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून खर्डा किल्ल्यासाठी शिपायाची नेमणुक करावी यासाठी शिवप्रेमींनी अनेकवेळा पत्रव्यवहार केलेला असुन पुरातत्व विभागाकडून अजुनही दखल घेतली गेलेली नाही. या ठिकाणी आलेल्या पर्यटकांच्या गाडीतील पेट्रोल चोरीचे प्रकार घडत आहेत. किल्याच्या आत दारू, जुगार, आश्लील प्रकार देखील होत आहेत. असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तेथे येणारे शिवप्रेमी व पर्यटकांच्या भावना दुखावल्या जातात. ही बाब आपल्या जामखेड तालुका व खर्डा शहरासाठी खुप लाजिरवाणी आहे. या सर्व बाबींचा विचार करुन आपण खर्डा ग्रामपंचायत मार्फत किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर एका शिपायाची कायमस्वरूपी नेमणूक करावी जेणे करुन या सर्व गोष्टीवर आळा बसेल व किल्ल्याचे संवर्धन ही राखले जाईल.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका अध्यक्ष पांडुराजे मधुकर भोसले, संकेत सातपुते, रोहीत गोलेकर, तेजस चावणे, गणेश ढगे, ओंकार इंगळे, गोटु वाळुंजकर, नाना ईगंळे, बाळासाहेब ढाळे आदी धारकरी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment