जामखेड प्रतिनिधी :२६ सप्टेंबर
जामखेड तालुक्यात रक्तदानाची मुहूर्तमेढ खैरनार दादांनी. जनकल्याण रक्तपेढी २३ वर्षांपासून रक्त संकलन करत आहे. तर गेली वीस वर्षे जामखेड तालुक्यातून रक्त
संकलनाची जामखेडची परंपरा सुरू आहे. ना नफा ना तोटा तत्वावर २३ वर्षे हे काम सुरू आहे. गरीब रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देतो. रक्तदाता हाच रक्तपेढीचा आत्मा आहे.
आम्ही आवश्यकतेनुसार अनेक वेळा रक्तदात्यांना बोलावून रक्त उपलब्ध करून देतो. असे मत जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. विलास मढीकर यांनी व्यक्त केले.
जामखेड येथिल थोर समाजसेवक दिवंगत डॉ. डी. बी. खैरनार तथा दादा यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केलेली रक्तदान शिबीराची परंपरा २० वर्षांनंतरही सुरूच आहे. या शिबिराच्या माध्यमातून दरवर्षी शंभर पेक्षा जास्त रक्तपिशव्यांचे संकलन होते. अनेक रक्तदाते उत्फुर्त पणे रक्त दान करतात.
यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. वसंतराव झेंडे, डॉ. विलास मढीकर, डॉ. डी. बी. खैरनार फाऊंडेशनचे सदस्य डॉ. पी. बी खैरनार, डॉ. प्रमोद खैरनार, प्रसिद्ध व्यापारी रमेश गुगळे, अरूण चिंतामणी, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, डॉ. तनय खैरनार, ज्ञानेश्वर अंदुरे, उमेश देशमुख, राजेंद्र देशपांडे, शरद कार्ले, डॉ. प्रताप गायकवाड, प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्रविण चोरडिया, माजी प्राचार्य अनंता खेत्रे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
.
No comments:
Post a Comment