खर्डा प्रतिनधी:२७ सप्टेंबर
अहमदनगर व उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ट धम्मकार्य केल्याबद्दल तसेच बौध्द धम्माचे धार्मिक विधीचे शतकोपार कार्यक्रम केल्याबद्दल झाल्याबद्दल आपल्या खर्डा (शिवपट्टण ) गावचे सामाजिक कार्यकर्ते व बौद्धाचार्य भीमराव घोडेराव यांना "धम्मगिरी सम्यक कार्यगौरव पुरस्कार २०२२" ने सन्मानित करण्यात आले.
उस्मानाबाद जिल्हा भुम तालुक्यातील गिरगावात येथील धम्मगिरी बुध्द विहार येथे पार पडलेल्या पुरस्कार व वर्षावास कार्यक्रमात भीमराव घोडेराव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष_ रघुनाथ सुकाळे( भूम),
शाहीर बाबासाहेब राजगुरू, शाहीर व लेखक दिलीप शिंदे तसेच अनंत वाळके, बौद्धाचार्य बलभीम जावळे, माजी तालुकाध्यक्ष सुरेखा ताई सदाफुले; ग्रामपंचायत सदस्य सुनीता दीपक जावळे, गिरलगाव ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच
बिभीषण वाघमोडे, ग्रामस्थ महिला व पुरुष उपस्थित होते. पुरस्काराबद्दल भीमराव घोडेराव यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
दरम्यान हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भीमराव घोडेराव यांचा खर्डा येथेही यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपक जावळे , पोलीस वारंट कार्यकारी संपादक आशुतोष गायकवाड ,अशोक जावळे, राकेश कांबळे, नितीन जावळे, आकाश जावळे, दीपक जावळे, सागर जावळे, नितीन पैठणपगार आण्णा जावळे ,शंकर जावळे , उदय जावळे आदी कार्यकर्ते उपस्थितीत होते तर प्रास्ताविक विकास कांबळे यांनी केले तर आभार भीमराव घोडराव यांनी मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा