खर्डा प्रतिनधी:२५ सप्टेंबर
खर्डा येथील श्रुती संभाजी गोलेकर हिने २४सप्टेंबर २०२२ रोजी दौंड जिल्हा पुणे येथे राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा परीक्षेत सहभाग घेतला होता या स्पर्धेचे नियोजन व मार्गदर्शन प्राध्यापक सागर गवाडे यांनी केले होते स्पर्धा राज्यस्तरीय स्तरावर घेण्यात आली होती या स्पर्धेसाठी राज्यातून मुले व मुली परीक्षेसाठी बसले होते खर्डा येथील अबॅकस सक्सेस अकॅडमीच्या संचालिका वृषाली गणेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा येथील १४ विद्यार्थी परीक्षेत बसले होते या स्पर्धा परीक्षेचा पेपर कु. श्रुती गोलेकर हिने ५ मिनिटांचा पेपर अवघ्या २ मिनिटात सोडवुन राज्यात प्रथम क्रमांक मिळवला तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी एस.आर. पी. एफ. ग्रुप १ चे पुणे येथील देसाई साहेब, जयसिंग दरेकर ,डॉक्टर हर्षदा काळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते
खर्डा येथील सक्सेस अकॅडमीच्या संचालिका वृषाली ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रुती गोलेकर या विद्यार्थिनीने यश कमावले
सामाजिक कार्यकर्ते किरण राजे इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक दीपक गोलेकर यांची श्रुती गोलेकर ही पुतणी आहे या स्पर्धेत परीक्षेचे बक्षीस वितरण समारंभाचे आभार प्राध्यापक दिनेश पवार यांनी मानले , कु. श्रुती गोलेकर तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदन चा वर्षाव होत आहे
No comments:
Post a Comment