जामखेड प्रतिनिधी : २४ सप्टेंबर
शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणाची जाळे विणल्याने सर्व सामान्यांच्या मुलांना शिक्षणाची दार खुली झाली. त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई पाटील यांनी गळ्यातील मंगळसूत्र विकून शाळेसाठी पहिली इमारत बांधली. कर्मवीरांच्या दातृत्वामुळे रयत शिक्षण संस्थेचे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. रयत शिक्षण संस्थेचा परिवार हा कर्मवीर भाऊराव पाटलांचे विचारावर आजही चालला आहे. असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी व्यक्त केले.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे खर्डा इंग्लिश स्कूलच्या वतीने सिताराम गडाच्या प्रांगणात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आ. रोहित पवार बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांच्यावतीने बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सिताराम गडाचे मठाधिपती महालिंग नगरे महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर, सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, चेअरमन मुकुंद गोलेकर,
व्हाईस चेअरमन शिवाजी भोसले, चंद्रकांत गोलेकर, माजी सहसचिव एम. के. भोसले, एजाज जिकरे, ज्ञानेश्वर थोरात, रमेश पाटील, पोपट भुते, राजेंद्र गोलेकर, प्रवीण कुंभार, सुनील लोंढे, उद्धव ढेरे, राजू सय्यद, कपिल लोंढे, ज्ञानेश्वर इंगोले, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, महालिंग कोरे, हरिभाऊ गोलेकर, रामहरी गोपाळघरे , हनुमंत बारगजे , संदीप शिकारे , इत्यादी उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक सोमनाथ उगले, उपमुख्याध्यापक राजश्री दुधाळ आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. रोहित पवार म्हणाले की, खर्डा इंग्लिश स्कूल या विद्यालयात २२०० मुले शिक्षण घेत आहेत. तर ४० शिक्षक या ठिकाणी काम करीत आहेत. तसेच महाराष्ट्रात साडेचार लाख विद्यार्थी हे रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असून त्यांना अठरा हजार शिक्षक हे शिक्षणाचे ज्ञानार्जन करीत आहेत. असेही विचार यावेळी आ. पवार यांनी व्यक्त केले.
तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्तेश्वर फामदे व रामनाथ ढाकणे यांनी केले तर आभार हनुमंत वनवे यांनी मानले.
दरम्यान विद्यालयाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटलांची खर्डा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये लेझीम, टिपरी, लाठीकाठी, बँड पथक यांचा समावेश होता. तर विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक मोठ्या उत्साहात सहभागी झाली होते.
मिरवणूक पाहण्यासाठी खर्डेकरांनी मोठी गर्दी केली होती.
No comments:
Post a Comment