पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १८ मे
खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील धामणगाव येथील एक विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सविस्तर असे की जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील धामणगाव येथील रहिवासी व या घटनेची खबर देणारे महेश बाळासाहेब घुंमरे, वय १९ वर्षे, धंदा शेती, रा. धामणगाव यांनी खबर दिली की त्याची (भावजई) मयत गीता बाळासाहेब घुंमरे, वय २२ वर्षे, धंदा शेती, ही . आज दि. १८ मे रोजी सकाळी ९:०० वाजताचे सुमारास शिवाजी दादा पवार यांच्या धामणगाव धामणगाव शिवारातील विहीरीमध्ये पडल्याने तिला बाहेर काढून पुढील उपचारासाठी जामखेड येथील ग्रामिण रुग्णालय येथे घेवुन गेलो असता. तेथील डॉक्टरांनी तीला तपासले असता ती मयत झाली आहे असे सांगितेले. यानुसार महेश बाळासाहेब घुमरे यांनी दिलेल्या खबरीवरून खर्डा पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. एस. जायभाये हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment