पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१९मे
जामखेड पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखेचे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी अजिनाथ जाधव यांचा सत्कार जामखेड तालुक्यातील खर्डा येथे करण्यात आला यावेळी पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता बापूसाहेब गायकवाड , आशुतोष गायकवाड व खर्डा छावा प्रतिष्ठान ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला .
जामखेड पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी अजिनाथ जाधव यांची श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे बदली झाल्याच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहरासह इतर विविध ठिकाणी त्यांचे सत्कार होत आहेत तसेच खर्ड्याच्या छावा प्रतिष्ठान ग्रुपच्या वतीने व पोलीस वारंट समूहातर्फे त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता गायकवाड , उपसंपादक आशुतोष गायकवाड, वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी रफिक तांबोळी , छावा प्रतिष्ठान ग्रुपचे अध्यक्ष योगेश वाळुंजकर, उपाध्यक्ष तानाजी उंबारे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा