पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १७ मे
जामखेड येथील जामखेड ते करमाळा जाणारे रोडवर आयटीआय कॉलेजसमोरील रोडवर सखाराम मरीबा समुद्र व त्यांची पत्नी वैशाली सखाराम समुद्र दोघे तेथेच रोडचे कडेला विहीरीमध्ये पडलेले मुलाचे प्रेत पाहण्यासाठी थांबलेले असताना जामखेडकडे भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पोने
आयशर गाडी नं. एमएच. १५ सीके ४७४६ ने स्प्लेंडर मोटार सायकल न. एमएच. १६ ई. ८५८३ ला जोराची धडक दिल्याने वैशाली सखाराम समुद्र यांचा जागीच मृत्यू झाला तर सखाराम मरीबा समुद्र हे जखमी झाले आहेत.
याबाबत फिर्यादी बाळासाहेब मरीबा समुद्र यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की. आज दि. १७ मे रोजी सकाळी ११/०० वा. चे सुमारास जामखेड ते करमाळा जाणारे रोडवर आयटीआय कॉलेज जवळ एका विहारीमध्ये एक इसम मयत झाला असल्याने तेथे रोडवर लोकांची गर्दी जमा झाली होती. त्या गर्दीमध्ये यातील जखमी व मयत सखाराम व वैशाली हे रोडचे कडेला गाडी थांबवून सदर घटना पाहत असताना करमाळा गावाकडुन जामखेड गावाचे दिशेने एक आयशर गाडी नं. एमएच. १५ सीके ४७४६ हा भरवाय वेगात आला व सखाराम मरीबा समुद्र व वैशाली सखाराम समुद्र यांना जोराची धडक दिल्याने मयत वैशाली ही आयशर गाडीचे ड्रायव्हर बाजुचे चाकाखाली पडुन तीचे डोक्यावरून टॅम्पोचे चाक गेल्याने तीला गंभीर दुखापत होवून ती उपचारापूर्वीच जागीच मयत झाली व सखाराम समुद्र हे जखमी झाले.
त्यांना ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
याप्रकरणी सदर आयशर टॅम्पो चालकास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दुर्गादास रामदास कलाटे वय २५ वर्षे रा. कडेगाव मंडल ता. पांडर कोंडा जि. यवतमाळ असे असल्याचे पोलीसांकडून समजले आहे.
तरी आज दि. १७/०५/२०२३ रोजी दुपारी १/०० वा.चे सुमारास जामखेड ते करमाळा जाणारे रोडवर आयटीआय कॉलेज समोरील रोडवर जामखेड ता. जामखेड येथे माझा भाऊ सखाराम मरीबा समुद्र वहीनी वैशाली सखाराम समुद्र दोघेही रा. सुरदेवण ता. जामखेड हे तेथे रोडचे कडेला विहीरीमध्ये पडलेले मुलाचे प्रेत पाहण्यासाठी थांबलेले असताना दुर्गादास रामदास कलाटे वय २५ वर्षे रा. काडेगाव मंडल ता. पांडर कोंडा जि. यवतमाळ याने त्याचे ताब्यातील आयशर गाडी नं. एमएच. १५ सीके. ४७४६ हा करमाळा गावाकडुन जामखेड गावाचे दिशेने भरधाव वेगात व निष्काळजीपणाने रस्त्याचे परस्थीतीकडे दुर्लक्ष करून हयगयीने अविचाराने भरधाव वेगात वाहन चालवुन त्याने रोडचेकडेला उभे असलेल्या माझा भाऊ सखाराम मरीबा समुद्र व वहीनी वैशाली मरीबा समुद्र यांना जोराची धडक दिली व अपघात करुन अपघातात माझी वहीनी वैशाली सखाराम समुद्र हीचे मृत्युस कारणीभुत होवुन माझा भाऊ सखाराम याचे कमी अधिक दुखापतीस व दोन्ही गाड्यांचे नुकसानीस कारणीभुत झाला आहे. अशी माहिती व फिर्यादी बाळासाहेब मरीचा समुद्र वय ३९ वर्षे रा. खुरदैठण ता. जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पोचालक दुर्गादास रामदास कलाटे वय २५ वर्षे रा. काडेगाव मंडल ता. पांडर कोंडा जि. यवतमाळ याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment