पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१७ मे
जामखेडमधील विठ्ठल मंदिरासमोर राहणाऱ्या प्रथमेश प्रशांतचंद्र भोसले या २३ वर्षीय तरूणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. जामखेड येथिल नागेश विद्यालयात ग्रंथपाल असणारे प्रशांतचंद्र महादेव भोसले यांचा तो मुलगा होता.
याबाबत सविस्तर असे की, जामखेड येथिल नागेश विद्यालयात ग्रंथपाल असणारे प्रशांतचंद्र महादेव भोसले हे मयत मुलगा प्रथमेशला सोबत घेऊन जामखेड करमाळा रोडलगत आयटीआय कॉलेज समोर जामखेड येथे असलेल्या आपल्या शेतजमीनत काल दि. १६/०५/२०२३ रोजी दुपारी २/३० वा.चे सुमारास मी एक्टीव्हा गाडी वरुन जामखेड करमाळा रोडलगत आयटीआय कॉलेज समोर जामखेड येथे शेतातून जनावरांसाठी मका आणण्यासाठी गेले होतो. त्यानंतर शेतातील मका: कापून त्याचे भारे तयार करून ठेवले . सायंकाळी ५/३० वा. चे सुमारास मयत प्रथमेश हा आमचे मकाचा भारा घेवून त्याच शेताचे कडेला असलेल्या जनावरांचे गोठ्यात ठेवून येतो असे सांगुन शेतातुन मकाचा भारा घेवुन गेला होता. परंतु त्यानंतर बराच वेळ झाला तरी मुलगा प्रथमेश हा आमचे जवळ शेतात आला नाही म्हणुन मुलाची आई वडीलांनी प्रथमेश याचा आजुबाजुचे परिसरात शोध घेतला परंतु तो कोठेही मिळून आला नाही. त्यावरून प्रथमेश हा मिसींग झाला म्हणून जामखेड पोलीस स्टेशनला मिसींग नोंद करण्यात आली होती.
मात्र आज त्याचा मृतदेह शेतातील विहीरत आढळून आला त्यानुसार मयत प्रथमेश याचे मामा विजय रावसाहेब काळदाते यांनी दिलेल्या खबरीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्टेबल संजय लोखंडे पोलीस नाईक अजय साठे करत आहेत.
No comments:
Post a Comment