पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १३ मे
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील मुंगेवाडी येथून चोरी गेलेल्या मोटारसायकलचा तपास लावत खर्डा पोलीसांनी चोरांकडून त्रिंबक सुरवसे रा. मुंगेवाडी ता. जामखेड यांची मोटारसायकल जप्त करून चारही चोरांना अटक करण्याची दमदार कामगिरी केली आहे.
याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 89/2023 भादवि कलम 379, 34 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी त्रिंबक सुरवसे रा. मुंगेवाडी ता. जामखेड यांची रुपये किमतीची सीडी डीलक्स मोटरसायकल सन 2020 मध्ये त्रिंबक सुरवसे यांचे मुंगेवाडी येथून रात्रीच्या वेळी चोरीस गेलेली होती. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना या गुन्ह्यातील आरोपी नामे १) अजय रमेशराव शेंडे राहणार दौंड, २) युवराज सुदर्शन मुंडे रा. गोविंदपुर तालुका कळंब जिल्हा धाराशिव ३) परमेश्वर भैरवनाथ मिसाळ रा गोविंदपुर तालुका कळंब जिल्हा धाराशिव व ४) सचिन प्रदीप कदम राहणार देवधानोरा तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांनी हा मोटारसायकल चोरीचा गुन्हा केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार खर्डा पोलीसांनी चारही आरोपींना मोठ्या शिताफीने अटक करून चोरीस गेलेली मोटरसायकल क्र. MH-13- 9070 ही मोटरसायकल जप्त केली आहे.
सदरची कारवाई खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांचे मार्गदर्शनखाली पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक बडे, शशी म्हस्के, बाळासाहेब खाडे, वैजीनाथ मिसाळ, पंडित हंबर्डे,विष्णू आवारे. यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment