जामखेडमध्ये हनीट्रॅपचा पर्दाफाश ,पोलीसांनी ठोकल्या बेड्या - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

रविवार, १४ मे, २०२३

Home जामखेड पोलीस स्टेशन जामखेडमध्ये हनीट्रॅपचा पर्दाफाश ,पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जामखेडमध्ये हनीट्रॅपचा पर्दाफाश ,पोलीसांनी ठोकल्या बेड्या

रविवार, मे १४, २०२३ जामखेड पोलीस स्टेशन,


पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १४ मे
     जामखेड तालुक्यातील चोबेवाडी येथिल एका महिलेने आपल्या नातेवाईकांशी संगनमत करून लातूर जिल्ह्य़ातील अहमदपूर तालुक्यातील ट्रक ड्रायव्हरला फेसबुकवर फ्रेंन्ड करून रिक्वेस्ट पाठवली. व आपला फोन नंबर देवून प्रेमाच्या गप्पा मारण्यास सुरवात केली. व आपल्या घरी बोलावून सदर ड्रायव्हरला लाठी-काठीने मारहाण करुन पैशाची मागणी केली. तसेच त्या महिलेसोबत अर्धनग्न अवस्थेत व जबरदस्तीने फोटो काढले. व पैसे दिले नाही तर बलात्काराची खोटी तक्रार दाखल करील अशी धमकी दिली. त्यामुळे ड्रायव्हरने घाबरुन आरोपींना काही पैसे दिले. मात्र त्यांची पैशाची भुक वाढल्याने ड्रायव्हर यांची पत्नी व इतर नातेवाईक यांना ड्रायव्हरचेच मोबाईल वरुन फोन करुन पैशाची मागणी करीत होते. दरम्यान सदर पिडित ड्रायव्हरच्या पत्नी हिने डायल ११२ नंबरवर कॉल केल्याने पोलीसांनी ड्रायव्हरच्या मोबाईल लोकेशन वरुन शोध घेतला व सविस्तर चौकशी करुन ड्रायव्हरचे तक्रारीवरुन सदर महिला व तिचे नातेवाईक यांचे विरुध्द अन्यायाने कैदेत ठेवणे, खंडणी व दुखापतीचा गुन्हा नोंद केला आहे. एक आरोपी अटक केला असुन इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.जामखेड तालुक्यात पहिल्यांदाच हनीट्रॅपचे प्रकरण घडल्याने चर्चांना एकच उधाण आले आहे. तर या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावून हॅनीट्रॅप उघड केल्याबद्दल जामखेड पोलीसांचे जनतेतून मोठे कौतुक होत आहे. 

याबाबत सविस्तर असे की यातील फिर्यादी व आरोपी यांची फेसबुकवर ओळखून यातील आरोपीत क्रमांक तीन हिने सामाजिक माध्यमाद्वारे फेसबुक फिर्यादी सोबत बोलून  तिचा मोबाईल क्रमांक देऊन नान्नज तालुका जामखेड येथे बोलावून घेऊन  चोबेवाडी गावचे शिवारात राहते घरी घेऊन गेली तेथे फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी करत काठीने मरण केली त्यानंतर फिर्यादीचे पत्नीस फिर्यादीचे फोनवरून फोन करून दोन लाख रुपयांची मागणी करून तुम्ही आम्हाला दोन लाख रुपये द्या नाहीतर आम्ही फिर्यादी या जीवे ठार मारून टाकू तसेच आमच्याकडे काढलेले फिर्यादीची फोटो व्हायरल करू नाहीतर त्याचे  विरुद्ध बलात्काराची खोटी केस करू असे म्हणाल्याने फिर्यादीने त्यांच्याकडील एक हजार रुपये रोख रक्कम दिली तसेच बाकी पैसे देतो असे म्हणून आरोपीत मजकूर यांनी फिर्यादीस त्यांचे घरामध्ये अनाधिकृत  डांबून ठेवून त्याचे बळजबरीने कपडे काढून त्याचे अर्ध नग्न अवस्थेत फोटो काढले आहेत. यानुसार फिर्यादी शरद बालाजी पाटील (वय ३५) , धंदा ड्रायव्हर, रा. शिरूर ताजबंद, ता. अहमदपूर, जि. लातूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी १) नितीन चंदन काळे २) सचिन काळे ३) सारिका काळे ४) किरण काळे यांचे विरुद्ध गु.र.नं. व कलम :- 200/2023भादवि कलम 386, 388, 342, 324, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. ११ मे रोजीचे ९:३० ते दि. १२ मे रोजीचे ४:०० वाजताचे दरम्यान जामखेड तालुक्यातील चोबेवाडी येथे घडली आहे.
  सदर गुन्ह्याचा तपास जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शिवाजी बोस हे करत आहेत.
सदरची कारवाई हि श्री. महेश पाटील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुनिल बडे, पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती व जामखेड पोलीस स्टेशनच्या कर्मचारी यांचे पथकाने मा. प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधिक्षक अहमदनगर, मा. श्री. आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली केली आहे.
चौकट..
अशा प्रकारचे हनीट्रॅप मध्ये कोणी अडकले असल्यास न घाबरता पोलीसांत तक्रार नोंद करावी. जामखेड पोलीसांच्या वतीने त्यांना योग्य ते सहकार्य केले जाईल असे आव्हान करण्यात येत आहे.

पोलीस निरीक्षक महेश पाटील
 पोलीस स्टेशन जामखेड, जिल्हा अहमदनगर
Tags # जामखेड पोलीस स्टेशन
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

जामखेड पोलीस स्टेशन
Posted at रविवार, मे १४, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels जामखेड पोलीस स्टेशन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या
    जामखेड प्रतिनिधी –21ऑक्टोबर चाकूचा धाक दाखवून एका कामगाराच्या फोनपे खात्यातून ८ हजार ५० रुपये हस्तांतरित करून त्याला लुटणाऱ्या...
  • लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक
    जामखेड प्रतिनिधी/१९ ऑक्टोबर२०२५ जामखेड तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीचे युवा आणि विकासाभिमुख सरपंच रघुनाथ पंढरीनाथ परकड हे आगा...
  • मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!
    जामखेड प्रतिनिधी/ 22ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे गंभीररीत्या बाधित झालेल्या मोहरी लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झा...
  • समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन
    जामखेड प्रतिनधी/२१ऑक्टोबर२०२५ जामखेड 11 नंबर वॉर्डमधील नगरपरिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यकर्ते पै.सागर भाऊ टकले य...
  • खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
    खर्डा,प्रारतिनधी /17जून2025 जामखेड तालुक्यातील खर्डा येथील न्यु इंग्लिश स्कूलजवळ आज दिनांक 17 जून, 2025 रोजी दुपारी 1:10 वाजता आ...
  • “‘माझ्या तब्येतीपेक्षा गावाच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा’ — भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांच्या संवेदनशीलतेला सभापती राम शिंदेंचा तत्काळ प्रतिसाद,मोहरी तलाव दुरुस्तीचा मार्ग मोकळा; सभापती शिंदेंकडून जलसंपदा विभागाला तातडीचे आदेश
    खर्डा प्रतिनिधी / १६ ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे भराव वाहून गेलेल्या मोहरी तलावाचा ज्वलंत प्रश्न आता मार्गी लागणार आहे. भाजपा नेते व ...
  • जामखेड तालुक्यातील १६ वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास; प्रेमीयुगुलीच्या आत्महत्येची घटना उघडकीस..पुण्यातील खडकवासला धरणाजवळ दोघांचे मृतदेह आढळले
    जामखेड प्रतिनधी/11जुलै2025 महादेव नगर, मांजरी येथील एका १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर केलेल्या शोधात आज सक...
  • खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी
    खर्डा, १८ जून 2025 जामखेड तालुक्यातील खर्डा शहरातील वार्ड क्रमांक १ मधील पारधी वस्तीतील नागरिक आपल्या त्वरित नागरी सुविधांसाठी...
  • दि .18 जूनपर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन सर्वेमध्ये सहभाग घ्या ; बाजीराव गोपाळघरे यांचे जामखेड तालुक्यातील नागरिकांना आवाहन
    जामखेड प्रतिनधी/१५जून २०२५ जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये, घरकुला पासून वंचित असलेल्या नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेस...
  • अहिल्यानगर-सोलापूर मार्गावर स्थानिकांना टोलमाफी आणि अंडरपास/ओव्हरपासच्या मागणीची केंद्राकडून दखल,आमदार रोहित पवार यांनी केली होती मागणी
    पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१३सप्टेंबर अहिल्यानगर-करमाळा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना टोलमाफी आणि सुरक्षिततेच्या दृष्...

Popular Posts

खर्डा शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती विविध उपक्रमांनी साजरी

धक्कादायक हत्या: चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची कुऱ्हाडीने सपासप वार करत केली हत्या; नंतर आत्महत्येचा प्रयत्न

जामखेडच्या खताच्या दुकानात मोठी चोरी, ३ लाखांचा माल गायब

खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

आ. रोहित पवार यांच्याकडून स्वखर्चातून मोहरी तलावाच्या दुरुस्तीची तयारी, कुकडी व सीना कालवा आणि बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाकडे निधीची मागणी,जलसपंदा विभागाने दिले कार्यवाहीचे आदेश

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

खर्डा परिसरात अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला– रहस्यमय घटनेचा तपास सुरू, परिसरात एकच खळबळ

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

सरकारच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणं हे तुमचं आमचं कर्तव्य - आ. प्रा.राम शिंदे

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *