पोलीस वारंट न्यूज नेटवर्क : १४ मे
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराज यांची विविध ठिकाणी साजरी करण्यात आली.
खर्डा ग्रामपंचायत व खर्डा येथील विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या असणार संघ छावा प्रतिष्ठान ग्रुपच्या वतीने आज दि. १४ रोजी संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांना पुष्पहार घालून तसेच मनोगते व्यक्त करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत गोपाळघरे, मा.पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर, मा .सरपंच संजय गोपाळघरे,नितीन सुरवसे ग्रामपंच्यायत सदस्य प्रकाश गोलेकर, मदन गोलेकर, महालिंग कोरे, महेश दिंडोरे, राजु मोरे , पत्रकार आशुतोष गायकवाड, दत्तराज पवार , पोलीस कॉन्स्टेबल शेषराव म्हस्के, छावा प्रतिष्ठान ग्रुपचे अध्यक्ष योगेश वाळुंजकर, उपाध्यक्ष तानाजी उंबारे , सुधीर वाळुंजकर , दीपक वाळुंजकर, जितेंद्र वाळुंजकर, आकाश वाळुंजकर, अक्षय सुर्वे ,बबलू गोलेकर, विनोद गटकळ, अंकुश क्षीरसागर, प्रवीण कोल्हे, बबलू कणसे, राज कोरे, दीपक ढेरे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment