पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १६ जून
भाजपा नेते माजीमंत्री आ. राम शिंदे यांना फेसबुक लाइव्हद्वारे जीवे मारण्याची धमकी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सागर गवसणे यास दि. १४ जून रोजी जामखेड न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मागील महिन्यात ३० मे रोजी जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक अमित चिंतामणी हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चोंडी येथील कार्यक्रमाचे तयारीत असताना सागर गवासणे याने त्यांना मोबाईलवर फोन करुन तुम्ही राम शिंदे यांच्या जवळचे आहात, त्यांना जुळवून घेण्याचे सांगा. नाही तर पाहून घेईन अशी धमकी दिली होती. त्यानंतर फेसबुक लाईव्ह करुन आमदार राम शिंदे यांचे नाव घेऊन घरात घुसून मारीन, अशी धमकी दिली होती. या घटनेमुळे जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती.
याप्रकरणी सागर गवसणे यास अटक करून जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एस एम जोशी यांनी त्यांना जामीन मंजूर केला. यावेळी सागर गवसणेच्या वतीने ॲड. हर्षल डोके यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून हा जामीन मंजूर करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment