पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १५ जून
ऐतिहासिक दृष्ट्या वैभव संपन्न असलेल्या खर्डा येथे असलेल्या श्री संत गितेबाबा मंदिर परिसरात सुविधासाठी निर्माण करण्यासाठी खा. सुजय (दादा) विखे व माजीमंत्री प्रा. राम शिंदे
यांनी तिर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत १० लक्ष रूपये निधी उपलब्ध करून दिला असून भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रविदादा सुरवसे व खर्डा ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच वैजीनाथ पाटील, माजी सरपंच संजय गोपाळघरे, माजी सरपंच आसाराम गोपाळघरे यांच्या हस्ते व सर्व सन्माननीय सदस्य व गितेबाबा भक्त गण यांच्या उपस्थितीत भुमीपुजन सोहळा पार पडला.
संत गितेबाबा हे संत भगवान बाबा यांचेही गुरू आहेत. विविध ठिकाणाहून पंढरपुरकडे जाणाऱ्या अनेक दिंड्या येथे येत असतात. या मंदिर परिसरात सोई सुविधा व्हाव्यात अशी मागणी अनेक वर्षांपासून भाविक भक्त करत होते. याचाच विचार करून व रवि दादा सुरवसे व कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन खा. सुजय विखे व आ. प्रा.राम शिंदे यांनी राज्याच्या तिर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत १० लक्ष रूपये निधी उपलब्ध करून दिल्याने कार्यकर्ते व भाविक भक्तांनी आनंद व्यक्त करत आ. सुजय विखे व आ. राम शिंदे यांचे आभार मानले आहेत.
No comments:
Post a Comment