आ. रोहित पवार यांनी घेतली पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट; जलजीवन मिशनच्या कामासंदर्भात भेटीत चर्चा - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

रविवार, ६ ऑगस्ट, २०२३

Home राजकीय बातम्या आ. रोहित पवार यांनी घेतली पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट; जलजीवन मिशनच्या कामासंदर्भात भेटीत चर्चा

आ. रोहित पवार यांनी घेतली पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट; जलजीवन मिशनच्या कामासंदर्भात भेटीत चर्चा

रविवार, ऑगस्ट ०६, २०२३ राजकीय बातम्या,

पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-६ ऑगस्ट

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची मुंबई भेट घेऊन जलजीवन मिशनच्या मतदारसंघातील कामासंदर्भात चर्चा केली.  कर्जत-जामखेड हे पर्जन्यमान कमी असलेले तालुके, शेतीला पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने शेतकरी नेहमी हतबल असत. तसेच महिलांना डोक्यावर हंडा घेऊन लांबून पाणी आणावं लागत असे. परंतु कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मागच्या ४ वर्षांत मतदारसंघातील १०० टक्के गावांना मुबलक पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले. जलजीवन मिशन अंतर्गत DPR, सर्वे, प्राथमिक परवानग्या, जिल्हा स्तरावर पाठपुरावा, राज्य शासनाकडे पाठपुरावा आणि प्रत्यक्ष काम सुरु होण्यापर्यंत सर्व प्रकारचा पाठपुरावा रोहित पवार यांनी केला. 

रोहित पवार आमदार झाल्यानंतर जलजीवनच्या कामांसाठी आपली एक वेगळी टीम मतदारसंघात तयार केली. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर काही ठिकाणी अतीशय खराब पद्धतीचे काम झालेले पाहायला मिळाले. एकूण 170 कामांपैकी 25 कामांमध्ये त्रुटी आढळून आल्या त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून तीन ते चार तास बैठक करुन खराब कामांचे सादरीकरण केले. त्यानंतर 4 कामांचे दुरुस्तीकरन झाले. परंतु, अजूनही 21 कामाचं दुरुस्तीकरण होणं बाकी आहे. त्याचबरोबर सर्व पाठपुरावा करूनही अजुन 17 कामे सुरू होणे बाकी आहे. याच अनुषंगाने आमदार रोहित पवार यांनी ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन ही उर्वरित कामं लवकरात लवकर मार्गी लावावीत अशी विनंती पत्राद्वारे प्रत्यक्ष भेटून केली आहे. 

जलजीवन मिशन अंतर्गत 170 कामांसाठी 314.07 कोटी रुपये निधी आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा करून मंजुर करून घेतला त्यापैकी खर्डा गावासाठी एकूण 17 कोटी रुपये, कोंभळी व इतर 11 गावांसाठी 32.09 कोटी रुपये, मिरजगावसाठी 22.85 कोटी रुपये, नान्नजसाठी 4.50 कोटी रुपये, जवळा गावासाठी 10.82 कोटी रुपये एवढा निधी आमदार रोहित पवार यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून मंजूर करून आणला. त्याचबरोबर जामखेड नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 168 कोटी रुपये निधीदेखील मंजूर करून आणला आहे. ग्रामपंचायत आणि नागरिक यांच्यावरील वीजेच्या बिलाचा ताण कमी व्हावा यासाठी मतदारसंघात ग्रामपंचायत ठिकाणी सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. परंतु अजूनही 17 गावं सोलर योजनेपासून वंचित आहेत त्याचेही काम लवकरात लवकर सुरू करावे, अशीही मागणी आमदार रोहित पवार यांनी मंत्री महोदयांना भेटून केली आहे. 

रोहित पवार यांनी नेहमीच नागरिक आणि पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन 100 टक्के गावं जलजीवन मिशनच्या अंतर्गत घेण्यासाठी प्रयत्न केला. ज्या नागरिकांकडून तक्रार येईल त्यांना लगेच योग्य मदत करुन तो विषय मार्गी लावला जात आहे. महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरवला जाईल त्याबरोबर शेतीला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा केला जाईल असा शब्द रोहित पवार यांनी नागरिकांना दिला होता. तोच शब्द खरा ठरवत मागच्या चार वर्षांत कोट्यवधी रुपयांची कामं जलजीवनच्या माध्यमातून कर्जत जामखेडमध्ये झालेली आहेत. आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची आमदार रोहित पवार यांनी भेट घेतल्यामुळे उर्वरित कामेही मार्गी लागतील आणि कामांची दुरुस्ती देखील लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.  

प्रतिक्रिया

निवडणुकीच्या काळामध्ये महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवणार असा शब्द मी दिला होता. त्याच अनुषंगाने जलजीवन योजनेत मतदारसंघातील सर्वच गावांचा समावेश करून घेतला. तसेच आपण पाठपुरावा केला आणि हे काम होत असताना ते चांगल्या प्रतीचे व्हावं कारण पुढील 30 वर्षाचे नियोजन यामध्ये आहे. आणि सामान्य माणसाला कोणतेही अडचण येऊ नये या दृष्टीने आपण प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. मंत्री महोदयांना भेटून जलजीवनची कामे मार्गी लावावी तसेच 17 गावे जी सोलार योजनेपासून वंचित आहेत. ती देखील सोलार योजनेत घेऊन सहकार्य करण्याची विनंती त्यांना केली.

- आमदार रोहित पवार
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at रविवार, ऑगस्ट ०६, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • मोठी बातमी: अवैध वसुलीचा व्हिडीओ व्हायरल; शेंडी बायपासवर ट्रकचालकांकडून पैसे घेताना पोलीस निलंबित
    अहिल्यानगर (दि. ११ सप्टेंबर) –  आहिल्यानगरमधिल शेंडी बायपास परिसरात ट्रकचालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या प्रकरणाचा व्ह...
  • धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनिधी/१८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवा...
  • जामखेड बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह सापडला, संजय कोठारी यांनी पोलिसांना दिली माहिती ,परिसरात खळबळ
    जामखेड प्रतिनधी/8सप्टेंबर2025 जामखेड येथील बसस्थानकावरील शेडमध्ये एका अंदाजे ७५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले प...
  • ब्रेकिंग न्यूज : अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणलेखर्डा हद्दीत स्थानीक गुन्हे शाखेचा छापा, तिरट जुगार अड्ड्यांवर ४० जण ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त
    खर्डा प्रतिनधी/सप्टेंबर2025 अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवा...
  • ५ लाख रुपयांच्या बनावट नोकरी फसवणुकीचा खर्डा पोलिसांकडून पर्दाफाश;२ वर्षे फरार आरोपी मुरलीधर नेटके नवी मुंबईतून अटक
    खर्डा प्रतिनधी/१७सप्टेंबर२०२५ खर्डा पोलीसांनी नोकरीचे आमिष दाखवून ५ लाख रुपयांची फसवणूक करणा-या फरार आरोपी मुरलीधर धर्मा नेटके र...
  • अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गावातून अपहरण करून पनवेलला नेले, मुख्य आरोपी अटकेत! परिसरात खळबळ!
    जामखेड प्रतिनिधी / ५ ऑक्टोबर २०२५ आष्टी तालुक्यातील एका गावातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने चारचाकी वाहनातून उचलून तिच...

Popular Posts

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

मोठी बातमी :स्थानिक गुन्हे शाखेचे धडाकेबाज कामगिरी! जामखेडमध्ये गोळीबार करणारे 6 आरोपी 24 तासाचे आत जेरबंद

निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले पोलीस सेवेतून बडतर्फ

जामखेड: पाळीव जनावरे नागरिकांनी मोकाट सोडू नये अन्यथा नगरपरिषदेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार - मुख्याधिकारी अजय साळवे

जामखेडमध्ये शांतता सुरक्षिततेसाठी श्री नागेश्वर यात्रेपूर्वी शांतता समिती बैठक संपन्न

जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पालकमंत्र्यांचा दणका: निर्भयपणे अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू करा- राधाकृष्ण विखे पाटील

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *