पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ६ जुलै
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील घोडेगाव येथील २८ वर्षीय तरुण शेतकऱ्यांने शेतातील जनावरांच्या गोठयातील पत्र्याच्या शेडच्या लाकडी वास्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद खर्डा पोलीस स्टेशन करण्यात आली असून पुढील तपास खर्डा पोलीस करत आहेत.
या घटनेत मयत शेतकऱ्यांचे नाव युवराज मारुती भोंडवे (वय २८) असे आहे. तरूण शेतकऱ्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत खर्डा पोलिसांकडून समजलेली महिती अशी की, या घटनेची खबर देणारे विठ्ठल नरहरी भोंडवे, (वय ६०) यांनी खबर दिली कि, दि. ५ आॅगस्ट सकाळी ६.३० वाजताचे सुमारास माझे शेतातील जनावरांच्या गोठयात पुतण्या युवराज मारुती भोंडवे याने शेतातील जनावरांच्या गोठयातील पत्र्याच्या शेडच्या लाकडी वासाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली.
मयत युवराज मारुती भोंडवे यांच्या मागे वृद्घ आई,वडील, पत्नी, एक मुलगा,तीन बहिणी असा मोठा परिवार आहे
पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्टेबल आर. के. सय्यद हे करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा