पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२३ मार्च
अहमदनगर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांची जामखेड पंचायत समिती शिक्षण गटशिक्षणाधिकारी कार्यालयास सदिच्छा भेट दिली असून त्यावेळी शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवेंच्या हस्ते भास्कर पाटील यांचा सन्मान करण्यात आला.भास्कर पाटील यांनी जामखेड तालुक्यातील बदलत्या सकारात्मक शैक्षणिक वातावरणाबाबत जामखेड शिक्षण विभागाचे भरभरून कौतुक केले.
यावेळी भास्कर पाटील हे यशवंत पंचायतराज पाणी कमिटीच्या बैठकीसाठी जामखेड येथे आले होते.पाटील नगर जिल्हयात शिक्षणाधिकारी प्राथमिक पदी नियुक्ती झाल्यापासून एक वेगळीच शिक्षणाची चळवळ सुरू झाली आहे. मिशन आपुलकी अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा व समाजाचा सहभाग संपूर्ण जिल्हयात गोळा झाला.गाव, वाड्या,वस्त्यावरिल जि.प.च्या शाळेंचा चेहरामोहराच बदलून गेला.मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानात त्यांचे मार्गदर्शनात जिल्ह्यातील १००% शाळांनी स्पर्धेत भाग घेतला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण झाले. हे सर्व करत असतांना प्रशासनावरही भास्कर पाटलांचा मजबुत पकड आहे. त्यांच्या बद्दल सर्वांना आदरयुक्त भिती आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाटील वेळोवेळी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक,पदवीधर या पदांची शिक्षकामधून प्रमोशन केले. त्यामुळे रिक्त पदाची पोकळी भरून निघाली. विद्यार्थी शिक्षणाची घोडदौड सुरू झाली. हे करत असतांना शिक्षकांच्या अडी अडचणी, एक तारखेलाच पगार करणे, मेडिकल बिले व इतर बीलेही मा. पाटील साहेबांनी विशेष लक्ष घातले.जामखेड शिक्षणविभागाला दिलेली सदिच्छाभेट तालुक्यातील शिक्षकांसाठी खूप महत्वाची ठरली.
सत्कारांच्या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, विस्तार अधिकारी सुनिल जाधव, नरवडे, केंद्रप्रमुख केशव गायकवाड, विक्रम बडे, नवनाथ बडे,अहमदनगर शिक्षक बँकेचे संचालक संतोष कुमार राऊत, विश्वस्त मुकुंदराज सातपुते, सुनिलमामा भामुद्रे, तागड सर, बाळू गोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment