पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२५ मार्च
कर्जत जामखेड मतदारसंघात जनतेकडून समर्थन मिळत नसल्याने आ. रोहीत पवार यांनी मतदारसंघातील जनतेची वैयक्तीक कामे अडवण्याचे काम सुरू केले आहे. राज्यातील महायुतीचे सरकारने सत्तेवर आल्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्जत जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या साडेचार हजारांपेक्षा जास्त विहिरींना मंजूरी (AS) मिळाली आहे. लोकांच्या विहीरींचे प्रस्ताव मंजूर करुन घेतले. त्यासाठी पंचायत समिती स्तरावर व्यक्तीशः लक्ष घातले. अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पाठपुरावा केला. आ. रोहीत पवारांकडून शेतकरी विरोधी धोरणांचा अवलंब करत शेतकऱ्यांच्या मंजुर विहीरीच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून या कामाची चौकशी लावण्याचे काम केले जात आहे. असा आरोप भाजपा युवा मोर्चाचे जामखेड तालुकाध्यक्ष बाजीराव गोपळघरे यांनी केला आहे.
राज्यातील महायुतीचे सरकारने सत्तेवर आल्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्जत जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या साडेचार हजारांपेक्षा जास्त विहिरींना मंजूरीच्या कामात येत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आ. प्रा. राम शिंदे यांनी मार्ग काढला. त्यामुळे आजपर्यंत कधीच नाही इतक्या साडेचार हजारांपेक्षा जास्त लोकांना विहीरी मंजूर झाल्या. यामुळे शेतकऱ्यांना तब्बल १८० कोटी रुपयांपेक्षाही जास्त पैसे विहिरींच्या माध्यमातून मिळणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला चार लाख या प्रमाणे या विहीरीं पुर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. त्यांच्या पिकाला हक्काचे पाणी देता येणार आहे. पण शेतकऱ्यांचे चांगले होत असेल तर नवे पर्व यांना खपेल कसे. त्यामुळे आमदार रोहित पवार त्यांनी राजकीय व्देषातून
या सगळ्या मंजूर विहिरींच्या प्रस्तावांची चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचे काम केले आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने नोटीस काढण्यात आल्या असून सदर विहीर मंजूरीची चौकशी करण्यात येत आहेत.
फक्त या कामाचे श्रेय आमदार प्रा. राम शिंदे या हेतूने सर्व खटाटोप असून सदर चौकशीत किती काळ जाईल माहीत नाही. त्यामुळे लोकांनी विहीरी कधी खोदायच्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय मंजूर झालेले सामान्य लोकांचे प्रस्ताव काहीतरी कारणे सांगून नामंजूर करायचे आणि आपल्या खास लोकांचे, आपल्यासाठी काम करणाऱ्या लोकांचे प्रस्ताव मंजूर करायचे आहेत का? अशी शंका आता निर्माण झाली आहे. त्यामुळे विहीरीं मध्येही कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचे काम आमदार रोहित पवार यांच्याकडून सुरु असल्याची दाट शंका येते. असे विविध आरोप करत अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या आ. रोहित पवार यांना लोक योग्य वेळी योग्य मार्गाने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत. असे मत भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपळघरे यांनी व्यक्त केले आहे.
No comments:
Post a Comment