पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१३एप्रिल
तालुक्यातील घोड प्रकल्पातून उन्हाळी आवर्तन क्रमांक २ सुरु करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीला तोंड देणाऱ्या गावांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या दुष्काळसदृष्य परिस्थिती असून यामुळे पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे कुकडीसह घोड प्रकल्पाच्या पाणी नियोजनाची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणी सोडण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली होती. याबाबतचे पत्रही त्यांनी जलसंपदा विभाग यांना दिले होते. त्यानुसार आज घोड प्रकल्पातून उन्हाळी आवर्तन क्रमांक दोन सोडण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीसाठी, चारा पिके, ऊस आणि उन्हाळी पिकांसाठी या पिकांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
-----.
चौकोट
‘‘घोड प्रकल्पातून उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत होती आणि सध्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर याबाबत नियोजन करुन निर्णय घेण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आल्याने घोड प्रकल्पातून दुसरं उन्हाळी आवर्तन सोडण्यात आलं. याबाबत प्रशासनाचे आभार.’’
रोहित पवार
(आमदार, कर्जत-जामखेड)
No comments:
Post a Comment