पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१२एप्रिल
दि.११/०४/२०२४ रोजी कुंभारतळे ग्रामीण विकास केंद्र जामखेड येथे बैठक पार पडली.
या वेळी ॲड.डॉ.अरुण जाधव म्हणतात की, राजकारणात समाजकारणात काम करण्यासाठी इतर समाजातील लोक आपल्या सोबत असायला पाहिजे, जामखेड तालुक्यात २० हजार भटके विमुक्त व आदिवासी आहेत. तरीही आज भटके विमुक्त समाजाला सत्ताधारी पुढारी किंमत नाही. समाज एकत्र येतोय, ताकद निर्माण होते. निवडणूक झाल्यावर तुम्हाला छापरामध्ये नेऊन ठेवले जाते. पुढारी समाजाचे शोषण, करणारे दिशाभूल करणारे आहे. आपण आपल्या समाजातील कार्यकर्ते पुढारी,नेते तयार करायचे आहे. प्रत्येक जातीच्या माणसाला एकत्र आणून संघटन मजबूत करणे, काळा ची गरज आहे. उद्याचा काळ गुलामीच आहे. संविधानाला नष्ट करण्याचे काम व्यवस्था करत आहे. तुमचे नेतृत्व कोण करणार गावा गाड्या मध्ये काय किंमत आहे. आपण आपल्या माणसासोबत जायचे, त्यांना समजावून सांगायचे त्यांनासोबत घेऊन जायचे. आपलेच काही लोक आपलेच खातात व काम झाल्यानंतर निघून जातात. यापासून आपण ओळखून राहिले पाहिजे. बाबासाहेबांची चळवळ गद्दारांनी मागे नेली आहे. आदिवासींवर अन्याय अत्याचार झाला. तर सर्वांनी तुटून पडायचे सर्वांनी एकत्र येऊन आपली ताकद वाढवायची आहे. भटके विमुक्त व आदिवासी यांच्या ४२ जातीसह महिलांसह एकत्र यायचं घरी बसणाऱ्या माणसाला नेता करू नये. तुम्हाला मदत किंवा किंमत जे देत नाही. त्यांच्यासोबत आपण जायचे नाही. आपण भटके विमुक्त व आदिवासी सर्व समाजाने जात-पात न पाहता एकत्रित येऊन काम केले पाहिजे.
भटक्या विमुक्त हे खरे इंग्रजांशी लढले. गुन्हेगारी ठरवले म्हणून ते जंगलात गेले.या समाजाला राजकीय क्षेत्रात येणे गरजेचे आहे. आपला नेता कोण आहे. त्याला ओळखूनच मतदानाचा बजावला पाहिजे. जो आपल्या सुख दुःखात सहभागी होईल याच्यासोबतच गेले पाहिजेत. असे व्यक्त केले.
बापु ओहळ यांनी आपल्या मनोकातून भटके विमुक्त व आदिवासी समाजाने शिक्षण घेणे गरजेचे आहे. शिक्षणामुळे चांगले व वाईट समजते. बाबासाहेबांनी कशाप्रकारे शिक्षण घेतले. तशी परिस्थिती आज नाही. मुलांना शिक्षणासाठी सोय होत नसेल, तर निवारा बालगृह जामखेड या ठिकाणी पाठवावे पहिली ते बारावीपर्यंत विनामूल्य शिक्षण दिले जाते. तसेच आपण सुज्ञ नागरिकाला व संविधानाला मानणाऱ्या उमेदवारालाच मतदान केले पाहिजे. संविधानाच्या विरोधात जाऊन बोलत असणाऱ्या उमेदवाराला मतदान देऊ नये. तसेच भटके विमुक्त व आदिवासी या समाजाने संघटन केले पाहिजे. या संघटन मध्ये महिला व पुरुष तसेच तरुण युवकांची फळी निर्माण केली पाहिजेत. जेणेकरून यांना संघटनेमार्फत प्रशिक्षण देऊन शासकीय योजना घेता येईल व अधिकार्यांशी बोलता येईल असे. या वेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून आपण सर्व 12 बलुते एकत्र येऊन उद्याची लढाई जिंकूया
या वेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. व सूत्रसंचाल मा.अजिनाथ शिंदे यांनी केले तर बैठकीचे आभार मा.नवनाथ जाधव सर यांनी म्हणाले व येथून पुढच्या काळात आम्ही आबांसोबत राहून काम करू असे जाधव सर म्हणाले. या बैठकीत बाळासाहेब लोखंडे वैदू समाज नेते, विशाल पवार आदिवासी नेते, अजिनाथ शिंदे, नवनाथ जाधव, मच्छिंद्र जाधव, संतोष चव्हाण, अरविंद जाधव, भिमराव चव्हाण, अंकुश पवार, धनराज पवार, सचिन भिंगारदिवे, राहूल पवार, दिपाली काळे, कदीर मदारी,द्वारका पवार,भगवान सुरवसे, ऋषिकेश गायकवाड,राजु शिंदे,अविनाश जाधव, लाला वाळके, आदि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment