पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१४ एप्रिल
आज दिनांक 14/4/2024/रोजी ग्रामीण विकास केंद्र संचालित भटके विमुक्त संसाधन केंद्र खर्डा येथे प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पार पाडली. या कार्यक्रमासाठी उपस्थित खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगाच्या पातळीवर चालणारे विचार असून त्यांचे कार्य महान आहे. करोडो लोकांचे उध्दारकर्ते आहेत. तसेच डॉ. बीपीनचंद्र लाड म्हणाले की, डॉक्टर बाबासाहेबांचे विचार जो मनात रुजवेल तो शिक्षणात पुढे जाईल. तसेच कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मध्ये विशाल पवार म्हणाले की सर्व महापुरुषांचे विचार एकच होते म्हणूनच भारतीय संविधान तयार करण्यासाठी सोपे गेले. महापुरुष आणि संतांचा एकच वैचारिक विचार आहे. या कार्यक्रमाची प्रस्ताविका निशा शिंगाने यांनी केली . कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड , कॉन्स्टेबल शशिकांत मस्के उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर लाड , भीमराव सुरवसे संविधान प्रचारक नीता इंगळे, दिपाली काळे, मंगल शिंगाणे, निशा
शिंगाने, उल्फा लोंढे, सुरेश पवार, शोभा ठोकळे, शरद ठोकळे, दीपा काळे, अनुसया पवार, सुरज पवार, रुकसाना मापाडी, उर्मिला कवडे, शेख रेश्मा मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment