पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/८ एप्रिल
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे(जि. अहिल्यादेवीनगर) 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार' पक्षाचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांची 'स्वाभिमान जनसंवाद यात्रा' कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात येत आहे. यानिमित्त आमदार रोहित पवार आणि निलेश लंके यांची ही जनसंवाद यात्रा सलग तीन दिवस कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध गावांना भेटी देणार आहे.
स्वाभिमानी जनसंवाद यात्रेची सुरुवात ९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता खर्डा येथून होणार असून नंतर सकाळी ११ वाजता नायगाव, दुपारी १२ वाजता राजुरी, दुपारी ३ वाजता नात्रज, सांयकाळी ४ वाजता चौंडी, सांयकाळी ७ वाजता जामखेड शहरातील नागरिकांशी मा.निलेश लंके आणि आमदार रोहित पवार संवाद साधणार आहेत. नंतर दुसऱ्या दिवशी १० एप्रिलला सकाळी ८ वाजता चापडगाव येथून यात्रेची सुरूवात होणार असून सकाळी १० वाजता माही जळगाव, दुपारी २ वाजता कोंभळी, दुपारी ३ वाजता निमगाव गांगर्डा, सांयकाळी ६ वाजता मिरजगाव आणि रात्री ८ वाजता कोरेगाव येथे मा.निलेश लंके आणि आमदार रोहित पवार नागरिकांशी चर्चा करणार आहेत. तसेच ११ एप्रिल ला सकाळी ८ वाजता अंबी जळगाव, १० वाजता कर्जत शहर, दुपारी १ वाजता शिंदे गाव, दुपारी २ वाजता कुळधरण, सांयकाळी ५ वाजता भांबोरा, सांयकाळी ६ वाजता बारडगाव सू., आणि सांयकाळी ७ वाजता राशीन येथे निलेश लंके आणि आमदार रोहित पवार नागरिकांशी संवाद साधणार आहेत.अशी माहिती पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment