पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/८एप्रिल
सकाळी जॉगिंगला जावुन येते असे सांगुन गेलेली मुलगी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावुन पळवून नेल्याची घटना जामखेड शहरात घडली असून मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरूद्ध जामखेड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणारी एक १७ वर्षे वयाची अल्पवयीन पिडीत मुलगी मी तपनेश्वर रोडला जॉगिंगला जावुन येते असे सांगुन गेली. मात्र बराच वेळ ती घरी न आल्याने तीच्या वडीलांनी शोधाशोध केली. मात्र ती न सापडल्याने अखेर एका अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी अमष दाखवुन फुस लावून अज्ञात कारणासाठी अज्ञात ठिकाणी पळवुन नेले असल्याची फिर्याद तीच्या वडीलांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिली त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गु र नं.व कलम 166/2024 भादवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल दि. ७ एप्रिल रोजी पहाटे ५:३० ते ७:३० दरम्यान जामखेड शहरातील तपनेश्वर रोड महादेव मंदीराजवळ घडली आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे हे करत आहेत.
No comments:
Post a Comment