पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/९एप्रिल
जामखेड शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने उच्छाद मांडला असून दुपारी १:०० वाजल्यापासून या कुत्र्याने तब्बल १० जणांना चावा घेतला असून या सर्वांना प्राथमिक उपचार करून अॅण्टी रेबीज सिरम ही लस देण्यासाठी जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी दिली आहे. तसेच हे पिसाळलेले कुत्रे अजूनही मिलिंदनगर व तपनेश्वर भागात फिरत असून नागरिकांनी यापासून सावधानता बाळगावी असे आवाहन आरोग्य विभागाचे वतीने करण्यात आले आहे.
जामखेड शहरातील तपनेश्वर, एस. टी. आगार व मिलिंदनगर सह शहरातील उत्तर भागात या कुत्र्याने संचित महेश उगले, कांतीलाल श्रीपती चव्हाण, संध्या सनी आढाव, प्राजक्ता दिलीप वाघ, शहादेव भगवान गिते, सौरभ महादेव येवले, योगिता सागर कुलथे, मिठूलाल ओसवाल, महेश नाथा आजबे, अमोल दत्तात्रय साठे या नागरिकांना चावा घेतला आहे.
या सर्व नागरिकांना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून अॅण्टी रेबीज सिरम ही लस देण्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी दिली आहे. तसेच हे पिसाळलेले कुत्रे अजूनही याच भागात फिरत असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाचे वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment