पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/९ऑक्टोबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेची घटना उघडकीस आली आहे.याबाबत पोलीसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार जामखेड तालुक्यातील खर्डा येथील अल्पवयीन तरुणी राहणार खर्डा तालुका जामखेड, वय १४ वर्ष सात महिने हीच्यावर दि. ७ ऑक्टोबर रोजी आरोपी सचिन दिलीप काळे वय १९ रा. खर्डा तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर याने ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून ३० वाजेच्या सुमारास खर्डा, तालुका जामखेड तसेच तारीख आठवत नाही रात्री आठ वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोरील रोडच्या शेजारी टाकीजवळ आरोपीने धमकी देऊन तिच्यासोबत अंधारामध्ये घेऊन जाऊन बळजबरीने शारीरिक संबंध केले तसेच यापूर्वी त्याने घरासमोरील टाकीजवळ बळजबरीने अत्याचार व शारीरिक संबंध धाक दाखवून निर्माण केले. अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्यामुळे खर्डा शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबतची फिर्याद सदर अल्पवयीन पीडित मुलीची आजी शारदा काळे (नाव बदलले आहे) वय ६० वर्ष राहणार खर्डा, तालुका, जामखेड यांनी दिली आहे.
या संदर्भात तपासाची चक्रे फिरवून खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड व पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपी सचिन काळे रा.खर्डा,ता.जामखेड यास २४ तासाच्या आत अटक केली असून, त्याच्यावर खर्डा पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नंबर व कलम 166 /2024 भारतीय न्याय संहिता कलम 64, 64 (2) (m) 351,(2) 351, (3) पोस्को अंतर्गत 4,6, सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खर्डा पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment