पोलीस वारंट न्यूज नेटवर्क ७ ऑक्टोबर
जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असणारी बाळगव्हाण ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात येऊन या ठिकाणी सरपंच पदी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन शिकारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी ग्रामपंचायत ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात होती. यावेळी गुलाल उधळून फटाक्यांची आतिषबाजी व जल्लोष करण्यात आला.
बाळगव्हाणच्या सरपंच पदी सचिन शिकारे यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, राष्ट्रवादीचे नेते मंगेश (दादा) आजबे, युवक तालुका कार्याध्यक्ष अशोक पठाडे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, अन्सार पठाण, माजी सरपंच कृष्णा खाडे, विनोद खाडे,भैय्या जाधव यांनी सत्कार व अभिनंदन केले.
यावेळी बोलताना सरपंच सचिन शिकारे म्हणाले की, पुढील काळात आमदार रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शासकीय योजना गावात राबविण्यात येणार असून गावच्या सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी सरपंच मंगल बाळू दाताळ, दादा दाताळ, अण्णा शिकारे, अतुल गोपाळघरे,भाऊसाहेब दाताळ, कैलास शिकारे, सिद्धू गोपाळघरे, काकासाहेब शिकारे, ज्ञानदेव गोपाळघरे, काकासाहेब शिकारे,राहुल गोपाळघरे,सचिन दाताळ, बाजीराव गंगावणे, सागर सोनवणे, ऋषिकेश शिकारे, अरुण शिकारे, गणेश शिकारे, अक्षय शिकारे इत्यादी सह बाळगव्हाणचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्कल नंदकुमार गव्हाणे व ग्रामपंचायत अधिकारी दिपाली घनवट यांनी काम पाहिले.
No comments:
Post a Comment