पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/7 एप्रिल
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाढणाऱ्या अवैध दारू धंद्यामुळे येथील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता तसेच आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा व खर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने खर्डा परिसरातील देशविदेशी दारू विक्री करणाऱ्यावर छापामारी करून एकूण ४३ हजार ३८५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करत दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सविस्तर असे की, खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे पथकाने दि. ५ एप्रिल रोजी खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या हाॅटेल व गावठी बनावटीची दारू विक्री करणाऱ्या व्यवसाईकांवर धाडी टाकण्यात आल्या त्यानुसार
धंद्यावर कारवाई केली आहे. या मध्ये १) हाॅटेल सहारा सोनेगाव, फिरोज नसीर शेख यांच्याकडुन ५००० रुपये २) सातेफळ येथे रामभाऊ भाउसाहेब भोसले यांचेकडे ६४७० रुपये, ३) हाॅटेल रंगोली खर्डा, गणेश बापु सुरवसे यांचेकडे २१२० रुपये, ४) हाॅटेल निसर्ग येथील अमोल शिवराम जायभाय, एकुण १११८० रुपये ५) हाॅटेल बळीराजे, राजेश मानिक कांबळे यांच्याकडुन ११४३५ रुपये ६) तेलंगशी फाटा येथील रोहीत विनोद साळुंके यांच्याकडे २९९० रुपये, ७) हाॅटेल शेतकरी येथुन सुजित केरु नागरगोजे यांचे कडुन १६९० रुपये देशी विदेशी तर ८) खर्डा येथील महीला नामे सुगंधा हरिशद्र चव्हाण हीचेकडुन हातभट्टीची २५ लिटर दारु जप्त करण्यात आली आहे. असा एकूण ४३ हजार ३८५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करत दारू विक्रेत्यांवर खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व खर्डा पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने केली आहे. पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शानाखाली पोलीस हेडकॉन्टेबल संभाजी शेंडे हे करत आहेत.
No comments:
Post a Comment